अल्पवयीन मुलीला गर्भवती करणारा नराधम कारागृहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2020 06:24 PM2020-03-30T18:24:57+5:302020-03-30T18:25:55+5:30

न्यायालयाने या आरोपीची कारागृहात रवानगी केली आहे.

Accused of rape case in jail | अल्पवयीन मुलीला गर्भवती करणारा नराधम कारागृहात

अल्पवयीन मुलीला गर्भवती करणारा नराधम कारागृहात

googlenewsNext

अकोला : एका अल्पवयीन मुलीला प्रेमाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या नराधमाने तिला गर्भवती केल्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी आरोपीस अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने या आरोपीची कारागृहात रवानगी केली आहे.
एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी एका अल्पवयीन मुलीला गर्भवती असल्याने स्त्री रुग्णालयात दाखल केल्याची माहिती पोलीस निरीक्षक रामेश्वर चव्हाण यांना देण्यात आली. त्यानुसार एक १५ वर्षीय पीडिता गर्भवती असून, ती माहिती लपवित असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी रुग्णालय गाठून पीडितेस विश्वास घेऊन तिचे बयान घेतले. पीडितेने दिलेल्या बयानानुसार तिला सोपान इंगळे नावाच्या युवकाने प्रेमसंबंधाचे आमिष देऊन तिच्यावर अत्याचार केले. यातूनच आरोपीने पीडितेसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यामध्ये ती गर्भवती राहिल्यानंतर आरोपीने तिला टाळाटाळ केली. त्यामुळे मुलीने एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३७६, पोस्को कलम अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली. त्यानंतर आरोपीस न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीची कारागृहात रवानगी केली आहे.

Web Title: Accused of rape case in jail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.