जठारपेठेतील युवकाच्या हत्याकांडातील आरोपींना पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:18 IST2021-04-06T04:18:04+5:302021-04-06T04:18:04+5:30

अकोला : रामदास पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जठार पेठ चौकात एका युवकाची लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत हत्या करणाऱ्या तीन आरोपींना ...

Accused in murder of youth in Jatharpethe remanded in police custody | जठारपेठेतील युवकाच्या हत्याकांडातील आरोपींना पोलीस कोठडी

जठारपेठेतील युवकाच्या हत्याकांडातील आरोपींना पोलीस कोठडी

अकोला : रामदास पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जठार पेठ चौकात एका युवकाची लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत हत्या करणाऱ्या तीन आरोपींना रामदास पेठ पोलिसांनी अटक करून सोमवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने तीनही आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. हे हत्याकांड मोबाईल देवाणघेवाणीच्या कारणावरून झाल्याची माहिती समोर आली आहे.

दिवेकर आखाडा परिसरातील अन्नपूर्णा अपार्टमेंट येथील रहिवासी सौरभ सुळे या युवकाने उमेश सुखदेवे याचा मोबाईल घेतल्याची माहिती उमेशला त्याच्या मित्रांनी दिली. मात्र प्रत्यक्षात सौरभ सुळे या युवकाने मोबाईल घेतला नव्हता; मात्र शनिवारी नशेत असलेल्या उमेश सुखदेवे याने त्याचा साथीदार सुनील वाडेकर व अमोल वाघमारे तिघेही राहणार लहान उमरी यांना सोबत घेऊन नशेतच सौरभ सुळे या युवकावर हल्ला चढविला. लाथाबुक्क्यांनी प्रचंड मारहाण केल्याने तसेच पोटात लाथा मारल्यामुळे सौरभ सुळे यांचा फडके हॉस्पिटलच्या गल्लीमध्ये जागेवरच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच रामदास पेठ पोलीस, स्थानिक गुन्हे शाखा व शहर पोलीस उपअधीक्षक यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी रविवारी दुपारी सुनील वाडेकर, उमेश सुखदेवे व अमोल वाघमारे राहणार लहान उमरी यांना ताब्यात घेतले. त्यांच्या अटकेची प्रक्रिया करून सोमवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने तीनही आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा तपास रामदास पेठ पोलीस करीत आहेत.

Web Title: Accused in murder of youth in Jatharpethe remanded in police custody