बिसेन हत्याकांडातील फरार आरोपी गजाआड

By Admin | Updated: August 15, 2015 01:27 IST2015-08-15T01:27:36+5:302015-08-15T01:27:36+5:30

शेतीच्या वादातून ६ जुलै रोजी झाले होते हत्याकांड.

Accused of murder in Bisen massacre Gajaad | बिसेन हत्याकांडातील फरार आरोपी गजाआड

बिसेन हत्याकांडातील फरार आरोपी गजाआड

अकोला: सुकोडा फाट्यानजीक घडलेल्या प्रकाशसिंह बिसेन हत्याकांडातील फरार आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेने शुक्रवारी अटक केली. त्यानंतर सदर आरोपी आकोट फैल पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला असून, शनिवारी न्यायालयासमोर हजर केले जाईल. प्रकाशसिंह बिसेन यांची शेतीच्या वादातून ६ जुलै रोजी कारखाली चिरडून हत्या केली होती. त्यानंतर आकोट फैल पोलिसांनी सलाम खानसह तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. यामध्ये सलाम खान, शेख इलियास व विजेंद्र कुरील तसेच आणखी काही आरोपींचा समावेश आहे. आकोट फैल पोलिसांनी सलाम खान, विजेंद्र कुरील, शेख इलीयास व शेख कय्युम या चार आरोपींना अटक केली असून, या हत्याकांडातील रिजवान शेख नामक आरोपी घटनेपासून फरार होता. सदर आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी अटक केली असून, त्याला आकोट फैल पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या आरोपीला शनिवार, १५ ऑगस्ट रोजी न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे

Web Title: Accused of murder in Bisen massacre Gajaad