शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

देशी कट्टे, जिवंत काडतूस जप्ती प्रकरणात पुण्यातील आरोपी जेरबंद; लॉरेन्स बिश्नोईसारख्या दिसणाऱ्या व्यक्तीसोबत कनेक्शन

By सचिन राऊत | Updated: February 4, 2024 16:31 IST

अकोट शहर पोलिसांनी अकोला नाक्याजवळील पुलाखाली दोन युवकांना संशयास्पदरित्या हालचाल करीत असताना ताब्यात घेतले होते.

अकोला : अकोट शहर पोलिसांनी १६ जानेवारी रोजी दोन युवकांकडून दोन देशी कट्टे व नऊ जिवंत काडतुस जप्त केले होते. त्यांच्या माहितीवरून तिसरा साथीदार व म्होरक्या पुण्यातील रहिवासी असलेल्या शुभम रामेश्वर लोणकर या तिसऱ्या आरोपीस पोलिसांनी ३० जानेवारी रोजी अटक केली असून त्याची चौकशी केली असता आरोपीचे लॉरेन्स बिश्नोई सारख्या दिसणाऱ्या व्यक्तीसोबत व त्याच्या भावासोबत ऑडिओ व व्हिडिओ असे इंटरनॅशनल कॉल झाल्याचे पोलीस तपासात समोर आल्याची माहिती पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांनी रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

अकोट शहर पोलिसांनी अकोला नाक्याजवळील पुलाखाली दोन युवकांना संशयास्पदरित्या हालचाल करीत असताना ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडून दोन देशी कट्टे जप्त करण्यात आले. त्यांची आणखी चौकशी केली असता एक खाली मॅक्झिन व नऊ जिवंत काडतुस या आरोपींकडून जप्त करण्यात आले होते. या प्रकरणात अकोट पोलिसांनी अजय तुलाराम देठे वय २७ वर्ष रा धोबीपुरा आकोट व प्रफुल विनायक चव्हाण वय २५ वर्ष रा अडगाव या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करून आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर या आरोपींची सखोल चौकशी केली असता या देशी कट्टे व जिवंत काडतुसांचा मास्टरमाईंड तिसरा आरोपी शुभम रामेश्वर लोणकर वय २५ वर्षे रा नेवरी ता अकोट हल्ली मुक्काम भालेकर वस्ती वारजे पुणे हा असल्याचे समोर आले. त्याचा शोध घेतला असता तो मध्य प्रदेशात असल्याची माहिती मिळाली; मात्र पोलिसांना तो या ठिकाणावरून पळून गेल्याची माहिती मिळाली. 

त्यानंतर अकोट पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेने त्याला पुणे येथून ३० जानेवारी रोजी अटक केली. अकोट न्यायालयासमोर त्याला हजर केले असता आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या दरम्यान पोलिसांनी तपास केला असता शुभम लोणकर यांच्या मोबाईल वरून इंटरनॅशनल गॅंगस्टर लॉरेन्स बिश्नोई सारख्या दिसणाऱ्या व्यक्तीसोबत इंटरनॅशनल व्हिडिओ कॉल झाल्याचे समोर आले तसेच लॉरेन्सचा भाऊ अनमोल बिश्नोई याचे सोबत ऑडिओ कॉल असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. यावरून अकोट शहरात आढळलेल्या दोन देशी कट्टे व जिवंत काडतुसांमागे मोठे गौडबंगाल असल्याची माहिती सध्या समोर येत आहे. या प्रकरणाचा तपास आकोट शहर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा संयुक्तरीत्या करीत आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक बच्चन सिंग, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, सहायक पोलीस अधीक्षक अनमोल मितल, स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख शंकर शेळके, अकोट शहरचे पोलीस निरीक्षक तपन कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेश जवरे, अख्तर शेख, गोपाल जाधव, चंद्रशेखर सोळंके, विशाल हिवरे, मनीष कुलट, प्रेमानंद पंचांग, रवी सदाशिव, सागर मोरे, कपिल राठोड, अब्दुल मजीद, वसीमउद्दीन, संदीप तायडे व चालक धर्मे यांनी केली.

लॉरेन्स बिश्नोई सोबत इंटरनॅशनल कॉल पुण्यातील वारजे परिसरातील रहिवासी असलेला शुभम लोणकर याला पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याच्या मोबाईलची झडती घेतली असता शुभम लोणकर च्या मोबाईल वरून लॉरेन्स बिश्नोई सारख्या दिसणाऱ्या व्यक्तीसोबत इंटरनॅशनल व्हिडिओ कॉल झाल्याचे समोर आले आहे. यासोबतच लॉरेन्सचा भाऊ अनमोल बिश्नोई याच्यासोबतही वारंवार बोलणे झाल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.

अकोटातील आरोपीचे पुणे कनेक्शनमूळचा अकोट तालुक्यातील नेवरी येथील रहिवासी असलेला शुभम लोणकर हा पुण्यात स्थायिक झाला आहे. मात्र त्यानंतरही आकोटात दोन देशी कट्टे व नऊ जिवंत काडतूस घेऊन त्याचे दोन साथीदार आढळल्याने पुण्यातून अकोटात नेमके कोणते षडयंत्र रचल्या जात होते याचा तपास पोलीस करीत आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसjailतुरुंग