फसवणूक प्रकरणातील आरोपी पोलीस कोठडीत
By Admin | Updated: December 10, 2014 01:24 IST2014-12-10T01:24:27+5:302014-12-10T01:24:27+5:30
वाहन खरेदी फसवणूक प्रकरण; १३ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी.

फसवणूक प्रकरणातील आरोपी पोलीस कोठडीत
अकोला : वाहन खरेदी फसवणूक प्रकरणी आरोपी असलेला औरंगाबाद येथील रहिवासी मीर सफदर अली हैदर अली याला अटक करण्यात आली. त्याला मंगळवारी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने १३ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
शहरातील रहिवासी शहजाद खान अनिस इक्बाल खान यांनी रामदासपेठ पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीमध्ये औरंगाबाद येथील शाहगंज चेलीपुरा येथील रहिवासी मीर सफदर अली हैदर अली याने वाहन खरेदीमध्ये फसवणूक करून ४ लाख ५0 हजार रुपयांचा गंडा घातल्याचे नमूद केले होते. या तक्रारीवरून रामदासपेठ पोलिसांनी आरोपी मीर सफदर अली हैदर अली याच्याविरुद्ध भादंविच्या कलम ४0६, ४२0, ३४ नुसार गुन्हा दाखल केला होता.
त्यानंतर आरोपी मीर सफदर अली हैदर अली याचा शोध सुरू केला आणि त्याच्या शोधासाठी एक पथक औरंगाबाद येथे रवाना केले. या पथकाने मीर सफदर अली हैदर अली याला अटक करून मंगळवारी सकाळी अकोला येथे आणले. मंगळवारी दुपारी त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने आरोपी मीर सफदर अली हैदर अली याला १३ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.