बैलजोड्या चोरणाऱ्या टोळीतील आरोपीस अटक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:15 IST2020-12-26T04:15:50+5:302020-12-26T04:15:50+5:30

सुकोडा फाटा येथील शेतकरी गजानन प्रल्हाद घ्यार यांनी अकोट फैल पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या शेतातून आरोपीने ४५ ...

Accused arrested for stealing oxen | बैलजोड्या चोरणाऱ्या टोळीतील आरोपीस अटक!

बैलजोड्या चोरणाऱ्या टोळीतील आरोपीस अटक!

सुकोडा फाटा येथील शेतकरी गजानन प्रल्हाद घ्यार यांनी अकोट फैल पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या शेतातून आरोपीने ४५ हजार रुपये किमतीचे दोन बैल चोरी केले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हे दाखल करून तपास सुरू केला. दरम्यान, पोलिसांनी हिवरखेड स्थित गाजी प्लॉट येथील रहिवासी अब्दुल आजाद अब्दुल गनी याला अटक केली. चौकशीदरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. पोलीस इतर फरार आरोपींचा शोध घेत आहेत. अटक आरोपीकडून चार लाख रुपये किमतीचे वाहन तसेच १५ हजार रुपये राेख, असा एकूण चार लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेंद्र कदम, पोलीस उप-निरीक्षक जनार्धन खंडेराव, शेख असलम, छोटू पवार, संजय पांडे, हरिशचंद्र दाते आदींनी केली.

याठिकाणी बैलजोड्यांची चोरी

आरोपीने अकोट, अडगाव, हिवरखेड, पंचगव्हाण यांसह अकोला, मूर्तिजापूर व अकोट तालुक्यात बैलजोडी चोरी केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Web Title: Accused arrested for stealing oxen