शहरं
Join us  
Trending Stories
1
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
2
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
3
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
4
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
5
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
6
पाळीव प्राण्यांना सन्मानाने ‘शेवटचा निरोप’; विशेष अंत्यविधी केंद्रांच्या उभारणीलाही सुरुवात
7
कडक! सलमान खानचं गजब ट्रान्सफॉर्मेशन, ६० वर्षांचा होणार भाईजान; बॉडी दाखवत म्हणाला...
8
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल
9
मुंब्रा दुर्घटना: रेल्वेच्या २ अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; ४ महिन्यांनंतर कारवाई
10
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
11
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
12
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
13
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
14
मुंबई अपहरण प्रकरण: रोहित आर्याचे एन्काउंटर; माजी मंत्री केसरकर यांची हाेणार चौकशी
15
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
16
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
17
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
18
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
19
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
20
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या

पातूरच्या नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांवर हल्ला करणाऱ्या आरोपीस अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 18:24 IST

पातूर : येथील पातूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी मिलिंद दारोकार यांच्यावर बुधवारी सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास हल्ला करणाऱ्या दोन पैकी एका आरोपीसअटक करण्यात पातूर पोलिसांना १ फेब्रुवारी रोजी यश आले आहे.

ठळक मुद्देमिलिंद दारोकार हे बुधवारी सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास डिझेल भरण्यासाठी जात असताना लाथाबुक्क्या आणि दगडाने मारले.या घटनेसंदर्भात सायंकाळी उशीरा पातूर पोलिसात मुख्याधिकारी मिलिंद दारोकार यांनी तक्रार दिली. या प्रकरणी पातूर पोलिसांनी १ फेब्रुवारी रोजी दोन्ही आरोपींविरुद्ध कलम ३५३, ३३२, २९९, ३२३, ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. तसेच सागर इंगळे यास पातूर पोलिसांनी अटक केली आहे.

पातूर : येथील पातूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी मिलिंद दारोकार यांच्यावर बुधवारी सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास हल्ला करणाऱ्या दोन पैकी एका आरोपीसअटक करण्यात पातूर पोलिसांना १ फेब्रुवारी रोजी यश आले आहे.मिलिंद दारोकार हे बुधवारी सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास डिझेल भरण्यासाठी जात असताना पेट्रोल पंप व धाब्याच्या कॉर्नरवर पाळत ठेवून असलेल्या सागर संजय इंगळे रा. नानासाहेब नगर पातूर आणि लखन डागोर रा.विजयनगर अकोला यांनी पातूर तहसीलपासून त्यांचा पाठलाग केला आणि मुख्याधिकारी यांची गाडी अडविली. दारोकार यांना गाडीच्या बाहेर काढून लाथाबुक्क्या आणि दगडाने मारले. दारोकार यांना मारहाण करुन दहशत निर्माण करणाºया या दोघांच्या तोंडाला कापड बांधलेले होते आणि त्यांच्या मोटरसायकलला कोरी नेमप्लेट होती. या घटनेसंदर्भात सायंकाळी उशीरा पातूर पोलिसात मुख्याधिकारी मिलिंद दारोकार यांनी तक्रार दिली. त्यानंतर त्यांना पातूर पोलिसांनी उपचाराकरिता प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले होते. या प्रकरणी पातूर पोलिसांनी १ फेब्रुवारी रोजी दोन्ही आरोपींविरुद्ध कलम ३५३, ३३२, २९९, ३२३, ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. तसेच सागर इंगळे यास पातूर पोलिसांनी अटक केली आहे. यातील दुसरा आरोपी लखन डागोर हा अकोल्यातील अट्टल गुन्हेगार असून, त्यांच्यावर विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. या दोघांना दारोकार यांना मारण्याची सुपारी देण्यात आली असावी, असा संशय व्यक्त केला जात असून, पातूर पोलिस आरोपींची कसून चौकशी करीत आहेत. पुढील तापस पातूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार डी. सी. खंडेराव करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)

न. प. कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलनपातूर न.प . चे मुख्याधिकारी मिलिंद दारोकार यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ १ फेब्रुवारी रोजी सकाळपासून पातूर नगरपरिषदेचे कर्मचारी तसेच अखिल भारतीय मजदूर संघटनेच्या कर्मचाºयांनी  काळ्या फिती लावून व कामबंद आंदोलन केले. तसेच आरोपींवर कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली. या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी तथा तहसीलदार यांना पाठविल्या. त्या निवेदनावर नबीखाँ रहीम खाँ, दीपक सुरवाडे, गजानन पाटील, प्रमोद घोडे, मो. गाणी उररहमान, विनोद माहुलीकर, ईश्वर पेंढारकर, कल्याणी सोळंके, मोनिका वानखडे, ए. एम. व्यवहारे, मदन खोडे, उज्ज्वल भरणे, एस. एस. विराणी, शे. यासीन यांच्यासह इतर कर्मचाºयांची स्वाक्षरी आहे. 

 

टॅग्स :Akola Ruralअकोला ग्रामीणCrimeगुन्हाPoliceपोलिस