कार चोरीतील आरोपी अटकेत
By Admin | Updated: July 14, 2017 01:36 IST2017-07-14T01:36:18+5:302017-07-14T01:36:18+5:30
अकोला : सिव्हिल लाइन्स पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कार चोरी करणे आणि ती विक्री करण्यामध्ये सहभागी असलेल्या एका अट्टल चोरट्यास पोलिसांनी यवतमाळ येथून अटक केली.

कार चोरीतील आरोपी अटकेत
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : सिव्हिल लाइन्स पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कार चोरी करणे आणि ती विक्री करण्यामध्ये सहभागी असलेल्या एका अट्टल चोरट्यास पोलिसांनी यवतमाळ येथून अटक केली. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्याला कोठडी सुनावली.
यवतमाळ येथील रहिवासी महेबूब खान हुसेन खान याने सिव्हिल लाइन्स पोलिस स्टेशनच्या हद्दीतून कार चोरी केली होती. एवढेच नव्हे, तर ही कार त्याने विक्रीही केली. या प्रकरणाची तक्रार सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात झाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून चोरट्यांचा शोध सुरू केला. सिव्हिल लाइन्स पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे सदर कार चोरी आणि विक्रीमध्ये यवतमाळ येथील रहिवासी महेबूब खान याचा सहभाग असल्याचे समोर आले. यावरून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. ही कारवाई सिव्हिल लाइन्सचे ठाणेदार अन्वर शेख व संतोष आघाव यांनी केली.