अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या आरोपीस जामीन मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:19 IST2021-04-09T04:19:04+5:302021-04-09T04:19:04+5:30
मूर्तिजापूरच्या पुंडलिकनगर येथील एका अल्पवयीन मुलीचे २६ जानेवारी रोजी अपहरण करण्यात आले होते. मुलीच्या आईच्या तक्रारीनुसार मूर्तिजापूर शहर पोलिसांनी ...

अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या आरोपीस जामीन मंजूर
मूर्तिजापूरच्या पुंडलिकनगर येथील एका अल्पवयीन मुलीचे २६ जानेवारी रोजी अपहरण करण्यात आले होते. मुलीच्या आईच्या तक्रारीनुसार मूर्तिजापूर शहर पोलिसांनी आरोपी विक्की राजू भोसले (रा. देवनगर, दिग्रस, जि. यवतमाळ) याच्याविरुद्ध भादंवि कलम ३६३, ३६६ (अ) नुसार व अनुसूचित जातिजमाती प्रतिबंधक कायदा कलम ३ (२) नुसार गुन्हा दाखल केला होता. आरोपी पुंडलिकनगरात भाड्याने खोली करून राहत होता. आरोपीने शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून फूस लावून पळविले असा आरोप होता. पोलिसांनी दीड महिना आरोपीचा शोध घेतला. अखेर १७ मार्च रोजी दिग्रस येथून पोलिसांनी प्रेमीयुगुलास ताब्यात घेतले. या प्रकरणात ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल झाल्यामुळे या प्रकरणाचा तपास मूर्तिजापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष राऊत यांनी केला. दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर आरोपीस काही अटींवर न्यायालयाने जामीन मंजूर केला. आरोपीतर्फे ॲड. नरेंद्र बेलसरे, ॲड. एम. एस. वाकोडे यांनी; तर सरकारतर्फे साहाय्यक सरकारी विधिज्ञ किरण खोत यांनी बाजू मांडली.