आकोटात रेल्वेचालकाच्या सतर्कतेने अपघात टळला
By Admin | Updated: October 20, 2014 01:46 IST2014-10-20T01:46:44+5:302014-10-20T01:46:44+5:30
रेल्वे रूट बदलण्यात न आल्याचे रेल्वे चालकाच्या लक्षात आल्याने फार मोठा अपघात टळला.
आकोटात रेल्वेचालकाच्या सतर्कतेने अपघात टळला
आकोट (अकोला) : अकोला-खंडवा या मीटरगेज मार्गावर आकोट रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे रूट बदलण्यात न आल्याचे रेल्वे चालकाच्या लक्षात आल्याने फार मोठा अपघात टळला. ही घटना रविवारी १९ ऑक्टोबर रोजी दुपारी २.३0 वाजताच्या सुमारास घडली. या प्रकारामुळे रेल्वे प्रवाशांमध्ये खळबळ उडाली होती. प्राप्त माहितीनुसार, आकोट रेल्वे स्थानकावर क्रॉसिंग होते. अकोल्याकडे जाणारी रेल्वेगाडी निघून गेल्यानंतर खंडव्याकडे जाणार्या रेल्वेकरिता रूळ बदलविण्याची रेल्वे यंत्रणा विसरून गेली. त्यानंतर रेल्वेस्थानकावरून खंडव्याकडे जाणारी रेल्वे निघाली; परंतु रूळ बदललाच नसल्याचे चालकाच्या लक्षात आल्यानंतर त्याने आपत्कालीन परिस्थितीत रेल्वे थांबविली. त्यामुळे फार मोठा अपघात टळला. दुपारी ३.४५ वाजता रूळ बदलल्यानंतर ही रेल्वे खंडव्याकडे रवाना करण्यात आली. यावेळी प्रवाशांना एक ते दीड तास रेल्वे स्थानकावर ताटकळत बसावे लागले.