गोरेगाव खु. (अकोला) : नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी ३१ डिसेंबर रोजी गावानजीकच्या शेतात आयोजित करण्यात आलेल्या पार्टीत सहभागी होऊन घराकडे परतणाऱ्या येथील शिरीष विश्वासराव तायडे या तरुणाचा मोटारसायकल अपघातात मृत्यू झाला. रविवार, ३१ डिसेंबरच्या मध्यरात्रीनंतर हा अपघात घडला.अकोला तालुक्यातील गोरेगाव खुर्द येथील काही तरुणांनी रविवार, ३१ डिसेंबर रोजी नवीन वर्षाच्या स्वागतानिमित्त गावानजीकच्या शेतात पार्टी आयोजित केली होती. गावातीलच आदित्य तिडके यांच्या शेतात न्यू ईयर सेलिब्रेशन पार्टी रंगली. या पार्टीत शिरीष तायडे हा रत्नदिप तायडे व रोहन तायडे या आपल्या सैन्यातील मित्रांसोबत सहभागी होण्यासाठी मोटारसायकलवरून गेला. मध्यरात्रीपर्यंत पार्टी केल्यानंतर घराकडे परत येत असताना रत्नदिप मोटारसायकल चालवित होता. मन्साराम तिखिले यांच्या शेताजवळच्या वळणावर रत्नदिपचे नियंत्रण सुटले व मोटारसायकल रस्त्याच्या कडेला असलेल्या विद्युत खांबला जाऊन धडकली. ही धडक एवढी जोरदार होती की, यामध्ये शिरीष तायडे हा जागीच मृत्यूमुखी पडला. या अपघातात रत्नदिप तायडे हा देखील जखमी झाला. यावेळी त्यांच्यासोबतच घरी परत येत असलेल्या इतर मित्रांनी शिरीष तायडे याला अकोला येथे रुग्णालयात आणले; परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. शिरीष हा विश्वास तायडे यांचा एकुलता एक मुलगा होता. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे.
‘न्यू ईयर सेलिब्रेशन’ करून घरी परतणाऱ्या तरुणाचा अपघाती मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 15:30 IST
गोरेगाव खु. (अकोला) : नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी ३१ डिसेंबर रोजी गावानजीकच्या शेतात आयोजित करण्यात आलेल्या पार्टीत सहभागी होऊन घराकडे परतणाऱ्या येथील शिरीष विश्वासराव तायडे या तरुणाचा मोटारसायकल अपघातात मृत्यू झाला. रविवार, ३१ डिसेंबरच्या मध्यरात्रीनंतर हा अपघात घडला.
‘न्यू ईयर सेलिब्रेशन’ करून घरी परतणाऱ्या तरुणाचा अपघाती मृत्यू
ठळक मुद्देयेथील शिरीष विश्वासराव तायडे या तरुणाचा मोटारसायकल अपघातात मृत्यू झाला.रविवार, ३१ डिसेंबरच्या मध्यरात्रीनंतर हा अपघात घडला.मोटारसायकल रस्त्याच्या कडेला असलेल्या विद्युत खांबला जाऊन धडकली.