अकोल्यातील शिक्षकाचा अपघाती मृत्यू, चार जखमी

By Admin | Updated: January 4, 2016 02:44 IST2016-01-04T02:44:20+5:302016-01-04T02:44:20+5:30

लग्नाहून परतताना खामगावनजिक उलटली कार.

Accidental death of teacher in Akola, four injured | अकोल्यातील शिक्षकाचा अपघाती मृत्यू, चार जखमी

अकोल्यातील शिक्षकाचा अपघाती मृत्यू, चार जखमी

खामगाव (बुलडाणा): समोरून येणारा ट्रक चुकविण्याच्या प्रयत्नात कार उलटून झालेल्या अपघातात एक जण ठार, तर चार जण जखमी झाले. रविवारी दुपारी राष्ट्रीय महामार्गावर खामगावनजीक हा अपघात झाला. नांदुरा तालुक्यातील तरवाडी येथून लग्नसमारंभ आटोपून तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड येथील नितीन विनायकराव गिर्‍हे (वय ३८), पुरण मराजी दवंडे (वय ५0) आणि विजय आत्माराम खिरोडकर (वय ५0), तसेच आकोट तालुक्यातील दिनोडा येथील गजानन नारायण टिकार (वय ४४ ) आणि तेल्हारा तालुक्यातील अडगाव येथील धिरज चंद्रप्रकाश निमकर्डे (वय २८) हे कार क्रमांक एम.एच.३0-एल-५९३६ ने परत निघाले होते. दुपारी ३.३0 ते ४ वाजताच्या सुमारास नांदुरा येथून खामगावकडे येत असताना समोरुन येणार्‍या ट्रकला चुकविण्याच्या प्रयत्नात कार उलटली. या अपघातात नितीन विनायकराव गिर्‍हे हे जागीच ठार तर इतर चौघे जखमी झाले. त्यांना तात्काळ खामगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुरण मराजी दवंडे गंभीर जखमी असल्याने त्यांना अकोला येथे हलविण्यात आले. मृत नितीन गिर्‍हे हे शिक्षक होते.

Web Title: Accidental death of teacher in Akola, four injured