शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वारकर्‍यांच्या दिंडीला अपघात : अन् उमरा कापसे गावातील वारकरी माघारी परतले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 02:00 IST

बाळापूर/वाडेगाव : वाशिम जिल्ह्यातील उमरा कापसे येथील १७0 वारक री श्रींच्या प्रकट दिनानिमित्त शेगावला जाण्यासाठी १ फेब्रुवारी रोजी पायदळ निघाले होते. आपले चार सहकार्‍यांचे निधन झाल्याने या वारकर्‍यांनी श्रींचे दशर्न न घेता परत जाण्याचा निर्णय घेतला.

ठळक मुद्देचार सहकार्‍यांचे निधन झाल्याने या वारकर्‍यांनी श्रींचे दशर्न न घेता परत जाण्याचा निर्णय घेतलावाडेगावच्या ग्रामस्थांनी दिला मदतीचा हात ट्रकचालक फरार 

लोकमत न्यूज नेटवर्कबाळापूर/वाडेगाव : वाशिम जिल्ह्यातील उमरा कापसे येथील १७0 वारक री श्रींच्या प्रकट दिनानिमित्त शेगावला जाण्यासाठी १ फेब्रुवारी रोजी पायदळ निघाले होते. आपले चार सहकार्‍यांचे निधन झाल्याने या वारकर्‍यांनी श्रींचे दशर्न न घेता परत जाण्याचा निर्णय घेतला.उमरा कापसे येथील उत्तम पंडितराव कापसे यांच्या नेतृत्वात १ फेब्रुवारीला पायदळ दिंडी शेगाव येथे जाण्यासाठी निघाली होती. ही पायदळ दिंडी विविध ठिकाणी मुक्काम करून ५ फेब्रुवारी रोजी पातूर-बाळापूर रस्त्यावरील बाघ फाट्यावर पोहोचली होती. तेथे विसावा घेत असतानाच ही घटना घडली. या अपघातामुळे दिंडीतील वारकरी भेदरले होते. या वारकर्‍यांना वाडेगाव येथील ग्रामस्थांनी धीर दिला. चार वारकर्‍यांच्या मृत्यूने हादरलेल्या इतर वारकर्‍यांनी संत नगरी शेगावचा पुढील प्रवास थांबवला. तसेच श्रींचे दर्शन न घेता परत आपल्या गावी जाण्याचा निर्णय घेतला. या वारकर्‍यांना आपल्या गावाकडे जाण्यासाठी संतोष लोखंडे,महेंद्र अप्पा,बी.के.काळे व बाबुराव अजगर यांनी मदत केली. आपल्या सहकार्‍यांच्या मृत्यूने दु:खी झालेल्या वारकर्‍यांनी साश्रू नयनांनी परतीचा मार्ग धरला. 

वाडेगावच्या ग्रामस्थांनी दिला मदतीचा हात वारकर्‍यांचा अपघात झाल्याची माहिती मिळताच वाडेगाव येथील ग्रामस्थांनी घटनास्थळावर धाव घेऊन सरकीखाली दबलेल्या ग्रामस्थांना बाहेर काढले, तसेच या मार्गाने जाणार्‍या इतरांनीही जखमींना मदतीचा हात दिला. तसेच अपघातामुळे भेदरलेल्या वारकर्‍यांना दिलासा दिला.

तीन दिवसांत १0 जण ठार गेल्या दोन दिवसांत पातूर आणि बाळापूर तालुक्यात अपघातांची मालिका सुरूच आहे. तीन दिवसात सहा अपघातात १0 जण ठार झाले आहेत. शनिवारी पातूर तालुक्यात तीन वेगवेगळ्य़ा अपघातात चार, तर बाळापूर तालुक्यात एक विद्यार्थी ठार झाला होता. रविवारी विवरा फाट्यावर दुचाकी अपघातात एक जण ठार झाला होता, तर सोमवारी झालेल्या भीषण अपघातात चार वारकरी ठार झाले आहेत. जिल्ह्यात रस्त्यावर असलेल्या खड्ड्यांमुळे अपघातात मोठी वाढ झाली आहे.

ट्रकचालक फरार अपघातानंतर ट्रकचालकाने घटनास्थळावरून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, बाळापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सोहेल शेख, ठाणेदार विनोद ठाकरे तसेच वाहतूक पोलीस, पोलीस स्टेशन तुकडी वाडेगावचे पोलीस चौकीचे पोलीस कर्मचारी आदी घटनास्थळावर पोहोचले, तसेच जखमींना तातडीने रुग्णालयात हलवले. 

टॅग्स :BalapurबाळापूरAccidentअपघातwashimवाशिम