रानडुक्कर आडवे आल्याने अपघात, एक ठार

By Admin | Updated: June 27, 2016 02:28 IST2016-06-27T02:28:30+5:302016-06-27T02:28:30+5:30

मोताळा तालुक्यातील घटना.

Accident of the Randukar horizon, one killed | रानडुक्कर आडवे आल्याने अपघात, एक ठार

रानडुक्कर आडवे आल्याने अपघात, एक ठार

मोताळा (जि. बुलडाणा): दुचाकीसमोर रानडुक्कर अचानक आडवे आल्याने घडलेल्या अपघातात नांदुरा तालुक्यातील खैरा येथील दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मोताळा-नांदुरा मार्गावरील तरवाडीनजीक २५ जूनच्या रात्री ११ वाजता घडली. संजय भिकाजी चोपडे (४0 रा. खैरा) हे दुचाकी (एम.एच. २८ पी. ६७८७) ने शनिवारी खासगी कामानिमित्त नांदुरा येथे गेले होते. शनिवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास परत येत असताना तरवाडीनजीक पोहोचल्यानंतर रानडुक्कर दुचाकीसमोर आल्यामुळे वाहनाचे संतुलन बिघडून संजय चोपडे खाली पडले. त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती तरवाडीचे पोलीस पाटील तेजराव कुटे यांनी मृतकाचे नातेवाईक प्रमोद दयाराम चोपडे (२८ रा. लोणवाडी ता. नांदुरा) यांना दिली. प्रमोद चोपडे यांनी कळविल्यावर बोराखेडी पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. याप्रकरणी भादंविचे कलम २७९, ३0४ अ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून, हेडकॉन्स्टेबल रामदास वाढे पुढील तपास करीत आहेत.

Web Title: Accident of the Randukar horizon, one killed