नाशिक जिल्ह्यातील खेळाडूंचा बोरगांव मंजू जवळ अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2019 06:50 PM2019-11-27T18:50:45+5:302019-11-27T19:27:47+5:30

जखमींना अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.

Accident of Nashik team returning from Amravati; Six were injured | नाशिक जिल्ह्यातील खेळाडूंचा बोरगांव मंजू जवळ अपघात

नाशिक जिल्ह्यातील खेळाडूंचा बोरगांव मंजू जवळ अपघात

Next
ठळक मुद्देअंकुर आदिवासी निवासी आश्रम शाळेचा संघ अमरावती येथील राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आला होता. बोरगाव मंजूनजीक त्यांच्या एम.एच.१५ जी. आर. ९९५८ क्रमाांकाच्या गाडीला विरुद्ध दिशेने येत असलेल्या ट्रकने जोरदार धडक दिली.

अकोला : अमरावती येथे राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जात असलेल्या नाशिक येथील संघाच्या वाहनाला बोरगाव मंजूनजीक अपघात झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. अपघातात संघातील सहा जण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहे. 
प्राप्त माहितीनुसार, अमरावती येथे गुरुवार २८ नोव्हेंबर पासून राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेला सुरुवात होत आहे. या स्पधेत सहभागी होण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील अलंगुन येथील अंकुर आदिवासी निवासी आश्रम शाळेचा संघ एम.एच.१५ जी. आर. ९९५८ क्रमांकाच्या गाडीने अमरावती येथे जात होता. मात्र, बुधवारी सायंकाळी बोरगाव मंजुनजीक ट्रकने संघाच्या वाहनाला जबर धडक दिली. घटनेत संघातील ६ जण गंभीर जखमी झालेत. घटनेची माहिती मिळताच बोरगाव मंजू ठाण्याचे पोलीस निरीक्षक हरीष गवळी यांनी घटनास्थळ गाठून गंभीर जखमींना अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. गाडीत एकूण १३ जण असून, उर्वरीत खेडाळू किरकोळ जखमी झाले. त्यांच्यावर बोरगाव मंजू येथेच प्राथमिक उपचार करण्यात आला. अपघातात तुकाराम गावीत, महेश पवार, कल्पेश सहारे, प्रभाकर धूम , रोशन गायकवाड, सुरेश गावीत हे गंभीर जखमी झाले असून, त्यांना अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Web Title: Accident of Nashik team returning from Amravati; Six were injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.