आपोतीकर हत्याकांडातील आरोपीस कोठडी

By Admin | Updated: December 11, 2014 00:54 IST2014-12-11T00:54:52+5:302014-12-11T00:54:52+5:30

आरोपीला गुरुवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश.

Accident murderer detained in jail | आपोतीकर हत्याकांडातील आरोपीस कोठडी

आपोतीकर हत्याकांडातील आरोपीस कोठडी

अकोला : युवराज ऊर्फ सागर आपोतीकर याच्या हत्येप्रकरणी मंगळवारी रामदासपेठ पोलिसांनी आणखी एका आरोपीस अटक केली होती. आरोपीस बुधवारी न्यायाधीश एमएमएम हुसैन यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपीला गुरुवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. देशमुख फैलात राहणारा युवराज ऊर्फ सागर फकीरा आपोतीकर (१९) याच्यावर १७ नोव्हेंबर रोजी पूर्ववैमनस्यातून विजयनगरातील कालू चिरावंडे (२३), सूरज कलाने (२३), छोटू थामेत (२५), पिया ऊर्फ प्रेम खरे (२७), शुभम पारोचे(२४), तिलक सारवान (२४), राहुल डागोर आणि कमल अनुप खरारे (२९) आदी आरोपींनी लोखंडी पाइप व काठय़ांनी हल्ला चढविला होता. अचानक झालेल्या या हल्ल्यात युवराजचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी कालू चिरावंडे, छोटू थामेत, शुभम पारोचे, राहुल डागोर यांना अटक केली होती. तिलक सारवान हा मात्र फरार होता. २ डिसेंबर रोजी पोलिसांनी त्याला अटक केली होती. त्याचा सहकारी कमल खरारे हा सुद्धा फरार होता. कमल हा अकोल्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर मोठय़ा शिताफीने त्याला अटक करण्यात आली. त्याला बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले.

Web Title: Accident murderer detained in jail