कोतवाल बुकाची नक्कल देण्यासाठी स्वीकारली लाच
By Admin | Updated: April 7, 2015 02:04 IST2015-04-07T02:04:32+5:302015-04-07T02:04:32+5:30
आकोट तहसील कार्यालयातील अव्वल कारकुनासह खासगी मदतनीस गजाआड.

कोतवाल बुकाची नक्कल देण्यासाठी स्वीकारली लाच
अकोला: कोतवाल बुकाची नक्कल देण्यासाठी तक्रारदाराला एक हजार रुपयांची मागणी करून ६00 रुपयांची लाच स्वीकारताना आकोट तहसील कार्यालयातील अव्वल कारकूनासह त्याचा खासगी मदतनीसला सोमवारी सायंकाळी लाचलुच पत प्रतिबंधक विभागाने अटक केली. एका तक्रारदाराने सोमवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. तक्रारीमध्ये आकोट तहसील कार्यालया तील खासगी मदतनीस अशोक वानखडे याने कोतवाल बुकाची नक्कल देण्यासाठी एक हजार रुपयांची लाच मागितली. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी आकोट तहसील कार्यालयामध्ये सापळा रचला. तक्रारदाराकडून अशोक वानखडे याने ६00 रुपयांची रक्कम स्वीकारताच दबा धरून बसलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी त्याला रंगेहात अटक केली. वानखडे याने अव्वल कारकून अशोक बानुबाकोडे यांचे समक्ष रेकॉर्डरूममध्ये ही लाच स्वीकारली. बानुबाकोडे यांनी वानखडेला मदतनीस म्हणून रेकॉर्डरूममध्ये ठेवून घेतले. त्यासाठी ते वानखडेला मोबदलाही देत. त्यामुळे या प्रकरणाशी बानुबाकोडे यांचाही संबंध असल्याने त्यांनाही अटक करण्यात आली. त्यांचेकडून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी कोतवाल बुकाच्या नक्कल जप्त केल्या. आरोपींकडून लाचेची रक्कम ज प्त करण्यात आली असून, मंगळवारी आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येईल.