लाचखोर उपनिबंधकाला घेऊन एसीबीचे पथक पुण्यात

By Admin | Updated: October 3, 2014 01:23 IST2014-10-03T01:23:31+5:302014-10-03T01:23:31+5:30

अकोला एसीबी पथकाने आरोपीची मुलगी व जावयाचीसुद्धा चौकशी केल्याची माहीती.

The ACB team in Pune, taking bribe | लाचखोर उपनिबंधकाला घेऊन एसीबीचे पथक पुण्यात

लाचखोर उपनिबंधकाला घेऊन एसीबीचे पथक पुण्यात

अकोला : एक हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडलेली सहायक उपनिबंधक सुनंदा चिं तामण मोरे हिला घेऊन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पथक गुरुवारी पुण्याला गेले होते. मोरे हिच्या पुण्यातील संपत्तीची तपासणी करण्यासोबतच एसीबीचे पथकाने तिची मुलगी व जावयाचीसुद्धा चौकशी केल्याची माहिती आहे.
बँकेत गहाण असलेल्या प्लॉटवर बोजा चढवायला आवश्यक असलेल्या खतावणी प्रमाणपत्रासाठी एक हजार रुपयांची लाच स्वीकारणार्‍या सहायक उपनिबंधक सुनंदा चिंतामण मोरे व तिचे सहकारी आशिष पिंजरकर, हिंमत शिराळे यांना सोमवारी अटक केली होती. मंगळवारी एसीबी पथकाने मोरे हिच्या दुर्गा चौकातील आणि पुण्यातील घरांची एसीबीने मंगळवारी झडती घेतली. झडतीदरम्यान मोरे हिच्या दुर्गा चौकातील घरामध्ये एकूण ३३ लाख रुपयांची बेहिशेबी मालमत्ता मिळून आली होती.
तसेच पुणे एसीबीने पुण्यातील घराचीसुद्धा झडती घेतली होती. गुरुवारी सुनंदा मोरे हिला एसीबीचे पोलिस निरीक्षक यू.ए. जाधव हे पुण्याला घेऊन गेले होते. पुण्यातील तिच्या संपत्तीविषयी एसीबीने पुणे महापालिका, तलाठी, तहसीलदार व उपनिबंधक कार्यालयाकडे माहिती मागवली आहे. तसेच एसीबीने तिच्या पुण्यातील मुलगी व जावयाचीसुद्धा चौकशी केल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक उत्तम जाधव यांनी दिली.

Web Title: The ACB team in Pune, taking bribe