जुन्या वादातून शिवीगाळ; आठजणांविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:23 IST2021-09-04T04:23:37+5:302021-09-04T04:23:37+5:30

खेट्री : पातूर तालुक्यातील चान्नी पोलीस ठाणेअंतर्गत चतारी येथे जुन्या वादातून दोन गटांत एकामेकांना शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी ...

Abusive from old arguments; Charges filed against eight persons | जुन्या वादातून शिवीगाळ; आठजणांविरुद्ध गुन्हा दाखल

जुन्या वादातून शिवीगाळ; आठजणांविरुद्ध गुन्हा दाखल

खेट्री : पातूर तालुक्यातील चान्नी पोलीस ठाणेअंतर्गत चतारी येथे जुन्या वादातून दोन गटांत एकामेकांना शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली असून, रात्री उशिरा परस्पर तक्रारीवरून चान्नी पोलिसांनी आठ आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

एका गटाच्या फिर्यादीनुसार, चार आरोपींनी घराचे कुलूप तोडले, तर दुसऱ्या गटाच्या फिर्यादीनुसार, चार आरोपींनी शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणात प्रिया योगेश जामोदे यांच्या फिर्यादीवरून आरोपी गोपाल नामदेव हिरळकर, नामदेव हिरळकर, मीरा नामदेव हिरळकर, योगेश नामदेव हिरळकर, तसेच दुसऱ्या गटातील मीरा नामदेव हिरळकर याच्या फिर्यादीवरून आरोपी गणेश महादेव जामोदे, योगेश महादेव जामोदे, सतीश भानुदास जामोदे, सुनीता भानुदास जामोदे, असे परस्पर तक्रारीवरून दोन्ही गटांतील आठ आरोपीविरुद्ध चान्नी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास ठाणेदार राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनात सहायक उपनिरीक्षक बाळकृष्ण येवले करीत आहे.

Web Title: Abusive from old arguments; Charges filed against eight persons