दरोड्यातील फरार आरोपी जेरबंदपांढरकवडा येथून अटक
By Admin | Updated: January 13, 2015 01:31 IST2015-01-13T01:31:14+5:302015-01-13T01:31:14+5:30
अकोला सिटी कोतवाली पोलिसांची कारवाई.

दरोड्यातील फरार आरोपी जेरबंदपांढरकवडा येथून अटक
अकोला - दरोडा, चोरी, घरफोडी, लुटमार अशा एक ना अनेक घटनेतील अट्टल दरोडेखोरास सिटी कोतवाली पोलिसांनी सोमवारी यवतमाळ जिल्हय़ातील पांढरकवडा येथून अटक केली. या अट्टल आरोपीस मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
इराणी वसाहत येथील रहिवासी गुलाम अली नादर अली याने सिटी कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीत अनेक चोर्या, घरफोड्या, लुटमार यासारखे गुन्हे केले असून, तो गत अनेक दिवसांपासून फरार होता. यासोबतच त्याने नांदेड येथेही लुटमार केली असल्याने, नांदेड रेल्वे पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यावर कलम ३९४, ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. कोतवाली पोलीस गत अनेक दिवसांपासून त्याचा शोध घेत होती. सोमवारी तो यवतमाळ जिल्हय़ातील पांढरकवडा येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यावरून सिटी कोतवाली पोलिसांनी यवतमाळ जिल्हा व नंतर पांढरकवडा गाठून त्याला अटक केली. गुलाम अली नादर अली या चोरट्यास सिटी कोतवाली पोलीस मंगळवारी न्यायालयात हजर करणार आहेत. गुलाम अली नादर अलीच्या अटकेमुळे सिटी कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या अनेक चोरी व दरोड्याच्या प्रकरणांचा छडा लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पोलीस त्याच्याची कसून चौकशी करीत असून न्यायालयात त्याच्या पोलीस कोठडीची मागणी केली जाईल.