अबब...१२७ फूट जिल्हयातील सर्वात उंच वृक्ष!
By Admin | Updated: August 1, 2016 15:17 IST2016-08-01T15:16:42+5:302016-08-01T15:17:09+5:30
राज्य शासनाच्यावतिने नुकतेच २ कोटी वृक्ष लागवड मोहीम राबविण्यात आली. जिल्हयात असलेले १२७ फूट उंच झाड पादचा-यांचे लक्ष वेधून घेत आहे.

अबब...१२७ फूट जिल्हयातील सर्वात उंच वृक्ष!
>नंदकिशोर नारे
ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. १ - राज्य शासनाच्यावतिने नुकतेच २ कोटी वृक्ष लागवड मोहीम राबविण्यात आली. जिल्हयात असलेले १२७ फूट उंच झाड पादचा-यांचे लक्ष वेधून घेत आहे.
वृक्षांची गणना करतांना जिल्हयात सर्वात उंच झाड म्हणून रिसोड रस्त्यावरील या झाडाची नोंदणी करण्यात आली आहे. जिल्हयात असलेल्या झाडांमध्ये २० ते २५ फूटापर्यंत वाढ झालेली अनेक झाडे डौलाने उभी दिसून येतात. पण पुरातन असलेल्या १२७ फूट उंच, ३१ फूट परीख असलेल्या काटसेवर झाडाचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या योग्य नियोजनामुळे डौलात उभे आहे. या झाडाला कोणीही बाधा पोहचवू नये म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतिने तेथे एक फलक लावून ‘कृपया झाडाला हात लावू नये व फांदया तोडू नये’ अशी सूचना लिहून ठेवलेली आहे. रिठदपासून ६ ते ७ किलोमिटर अंतरावर रस्त्याच्या कडेला असलेल्या या झाडावर काही महीन्याआधी मला तोडू नका.. या चित्रासह अनेक वृक्षसंगोपनाबाबत महत्वाचे स्लोगन लिहण्यात आले होते. सद्यास्थितीत ते मिटले आहे. परजिल्हयातील नागरिक येथून जातांना आवर्जून या झाडाखाली थांबून या झाडाची पाहणी करतात. गतवर्षी सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे या झाडाला कोणताही रोग निर्माण होवू नये म्हणून काही रासायनिक प्रक्रीया करण्यात आल्या होत्या. जिल्हयातील सर्वात उंच असलेल्या या झाडाखालून जातांना वाहनधारकांचे लक्ष गेल्या शिवाय राहत नाही.