शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

अकोला परिमंडळातील साडेपाच हजार शेतकऱ्यांना मिळते दिवसा वीज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 17:59 IST

परिमंडळातील ५ हजार ६१८ शेतकºयांना दिवसा सिंचन करणे शक्य झाले आहे.

अकोला: कृषी पंपांसाठी वीज जोडणी घेतली नाही किंवा वीज जोडणीचे पैसे भरून त्यांची वीज जोडणी प्रलंबित आहे, अशा शेतकऱ्यांना अटल सौर कृषी पंप योजना तसेच मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेत प्राधान्य दिल्याने परिमंडळातील ५ हजार ६१८ शेतकºयांना दिवसा सिंचन करणे शक्य झाले आहे.मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेत सहभागी होण्यासाठी सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थींना ३ एचपीसाठी १६ हजार ५६० रुपये (दहा टक्के) तर अनुसूचित जाती, जमाती गटातील लाभार्थींना ८ हजार २८० रुपये (५ टक्के), तर ५ एचपीसाठी सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थींना २४ हजार ७१० रुपये (दहा टक्के) तर अनुसूचित जाती, जमाती गटातील लाभार्थींना १२ हजार ३५५ रुपये (५ टक्के) एवढी रक्कम भरावयाची होती.मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेसाठी अकोला परिमंडळांतर्गत असणाºया अकोला जिल्ह्यातील ज्या शेतकºयांनी पैसे भरून एजन्सीची निवड केली आहे, त्यापैकी पहिल्या टप्प्यातील ६१३ आणि दुसºया टप्प्यातील ३७ शेतकºयांच्या शेतात सौर कृषी पंप बसविण्यात आले आहे. बुलडाणा जिल्ह्यातील ज्या शेतकºयांनी पैसे भरून एजन्सीची निवड केली आहे, त्यापैकी पहिल्या टप्प्यातील ४०९ आणि दुसºया टप्प्यातील ५०३ शेतकºयांच्या शेतात सौर कृषी पंप बसविण्यात आले आहे. वाशिम जिल्ह्यातील ज्या शेतकºयांनी पैसे भरून एजन्सीची निवड केली होती, त्यापैकी पहिल्या टप्प्यात १४२१ आणि दुसºया आणि तिसºया टप्प्यात ३२५ अशी परिमंडळातील एकूण ३३८० शेतकºयांच्या शेतात मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेत सौर कृषी पंप बसविण्यात आले आहेत.एकूण तीन टप्प्यात राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून, टप्पा दोन व तीनचे एकत्रित काम प्रगतिपथावर आहे. दुसºया व तिसºया टप्प्यात परिमंडळांतर्गत एकूण ६६७१ सौर कृषी पंप देण्याचे उद्दिष्ट असून, आतापर्यंत प्राप्त झालेल्या ९४९४ शेतकºयांच्या अर्जांना मंजूर करीत त्यांना त्यांचा वाटा भरण्यासाठी कोटेशन पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी ४६०७ शेतकºयांकडून पैसे भरून एजन्सीची निवड करण्यात आली आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Zoneअकोला परिमंडळmahavitaranमहावितरणFarmerशेतकरी