वैदर्भीय खेळाडूंमध्ये अधिक मेहनत करण्याची क्षमता
By Admin | Updated: April 21, 2015 00:26 IST2015-04-21T00:26:46+5:302015-04-21T00:26:46+5:30
मुलाखत; एअर रायफल शुटिंग प्रशिक्षक जितेश कदम यांचे मत
_ns.jpg)
वैदर्भीय खेळाडूंमध्ये अधिक मेहनत करण्याची क्षमता
राम देशपांडे : अकोला :अजिंक्य फिटनेस पार्क व विदर्भ कॅरम असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ह्यझेपह्ण या उन्हाळी प्रशिक्षण शिबिरात विद्यार्थ्यांकरिता नेमबाजीचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. १७ एप्रिलपासून सुरू झालेल्या या साहसी प्रशिक्षण शिबिरात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कीर्तीचे नेमबाज तयार करणारे मुंबई येथील प्रशिक्षक जितेश जयवंत कदम आले आहेत. जितेश यांना शालेय जीवनातच नेमबाजीची आवड निर्माण झाली. दादर येथील सरस्वती स्कूलमध्ये शिकत असतानापासून त्यांनी एअर रायफल शुटिंग स्पर्धांमध्ये सहभाग नोंदविण्यास प्रारंभ केला. सध्या मालाड वेस्टला राहणारे जितेश कदम हे प्रबोधनकार ठाकरे यांच्या नावाने ओळखल्या जाणार्या विलेपार्ले येथील शुटिंग रेंजवर तसेच ठाण्यातील मेजर सुभाष गावंड या नावाने ओळखल्या जाणार्या शुटिंग रेंजवर प्रशिक्षण देत आहेत. आजतागायत विविध स्तरांवर झालेल्या ह्यएअर गनह्ण व ह्यएअर रायफलह्ण शुटिंग स्पर्धांमध्ये त्यांनी सुवर्णपदके पटकाविली आहेत. मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रातील खेळाडूंना नेमबाजीचे प्रशिक्षण देणारे जितेश कदम हे अकोल्यात सुरू असलेल्या उन्हाळी प्रशिक्षण शिबिरात वैदर्भीय खेळाडूंना नेमबाजीचे प्रशिक्षण देत आहेत. शिबिरात सहभागी विद्यार्थ्यांना नेमबाजीचे धडे देऊन झाल्यानंतर एका निवांतक्षणी त्यांनी लोकमतशी दिलखुलास चर्चा केली.
प्रश्न : क्रिकेट एके क्रिकेट असे चित्र सध्या सर्वत्र दिसतं, विद्यार्थ्यांचा कल नेमबाजीसारख्या खेळाकडे वळविणे शक्य आहे का?
उत्तर : हो का नाही, हा खेळ जगविख्यात आहे. ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीच्या स्पर्धेत होणारी चढाओढ आपण नेहमी पाहतोच. हा एकमेव खेळ आहे, ज्यात खेळाडूला त्वरित रिझल्ट पहावयास मिळतो. यात मध्यस्थी म्हणून कोणताच पंच राहत नसल्याने राजकारण आडवे येत नाही. त्यामुळे स्पर्धेत यशस्वी कामगिरी करणारा नक्कीच वरपर्यंत पोहोचतो. शिक्षक व पालकांनी ही जाणीव विद्यार्थ्यांंना करून द्यायला हवी. क्रिकेट हा खेळ मलाही आवडतो, पण एखादा खेळ केवळ पाहतच बसायचे का? तर नाही, तो पाण्यापेक्षा खेळणे अधिक श्रेष्ठ असे मी मानतो.
प्रश्न : पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत विदर्भात नेमबाजीकरिता सोयी-सुविधा उपलब्ध नाहीत. आपले काय मत आहे?
उत्तर : होय, हे मान्य आहे. पण मी शाळेत असताना मुंबईत केवळ दोनच एअर शुटिंग रायफल रेंज होत्या. यात शिकण्याची जिद्द फार महत्त्वाची ठरते. दूरदुरून आणि वेळात वेळ काढून अनेकांनी प्रशिक्षण घेतले. त्यातूनच तर संजय चक्रवर्ती, सुमा शिरूर असे खेळाडू जन्माला आलेत. मान्य आहे, विदर्भात शुटिंग रेंज अर्थात ज्या ठिकाणी प्रत्यक्ष नेमबाजीचे प्रशिक्षण घेतले जाते ती जागा आणि त्यासाठी लागणारे वेपन्स अर्थात पिस्तूल व रायफल नाहीत. अकोल्यात धनंजय भगत यांनी उन्हाळी प्रशिक्षण शिबिराच्या माध्यमातून कॅरम असोसिएशनच्या जागेवर सुरू केलेल्या एअर रायफल रेंजचा वैदर्भीय विद्यार्थ्यांनी, खेळाडूंनी लाभ घ्यावा.
प्रश्न : या शिबिरात नेमबाजीचे प्रशिक्षण देण्यासाठी आपण आला आहात, पश्चिम महाराष्ट्रातील व विदर्भातील खेळाडूंमध्ये काय फरक जाणवतो?
उत्तर : माझा विद्यार्थी आहे यश अकोलकर. त्याने २0१४ मध्ये राज्य पातळीवर व राष्ट्रीय पातळीवर झालेल्या एअर रायफल शुटिंग स्पर्धेत अव्वल स्थान मिळविले. अनेक पुरस्कार व मेडल्स त्याने मिळविले आहेत. तो कुठला राहणारा आहे सागू? अकोल्याचा! पश्चिम महाराष्ट्र वा इतर ठिकाणच्या खेळाडूंच्या तुलनेत विदर्भातील खेळाडूंमध्ये अधिक मेहनत करण्याची क्षमता आहे. याचा उपयोग या भागातील विद्यार्थ्यांंनी जरूर करावा. आज देशाला उत्तमोत्तम खेळाडूंची गरज आहे. चांगल्या नोकरीच्या संधीदेखील या माध्यमातून मिळविता येतात.
प्रश्न : नेमबाजीमध्ये मुले अधिक श्रेष्ठ कामगिरी करतात, की मुली?
उत्तर : मुळातच मुलींचा स्वभाव आत्मकेंद्रित असतो. त्यामुळे त्यांचे मन एकाग्र होण्याची वृत्ती अधिक असते. मुलांमध्ये चंचलता अधिक असली तरी ते देखील एकाग्रतेवर नियंत्रण मिळवू शकतात. मुला-मुलींमध्ये भेदभाव करता येणार नाही, पण मुलांच्या तुलनेत मुली नेमबाजीमध्ये अधिक श्रेष्ठ कामगिरी करू शकतात. याचा लाभ मुलींनी जरूर घ्यायला हवा. मुलींनी नेमबाजी, आर्चरीसारखे खेळ आत्मसात केल्यास निश्चित त्यांना अधिक लाभ होऊ शकतो.
प्रश्न : या क्षेत्रात करिअर करताना पिस्तूल व रायफल अत्यंत महत्त्वाची ठरते. त्यासाठी लागणारा खर्च सामान्य खेळाडूंना कसा झेपावा?
उत्तर : १0 मीटर, २५ मीटर, ५0 मीटर, ३00 मीटर आणि १ हजार यार्ड या अंतरांप्रमाणे नेमबाजीच्या स्पर्धा खेळल्या जातात. निश्चितच यात करिअर करावयाचे असेल तर वेप्नस अर्था ही हत्यारे हाताळावीच लागतात. ती स्वतंत्रपणे घ्यायची म्हटल्यास खूप महागडी आहेत. इंर्पोटेड एअर रायफल घेण्यासाठी १ लाख ५0 हजार, तर पिस्तूल घेण्यासाठी १ लाख २५ हजार एवढा खर्च आहे. तो निश्चितच सामान्याला झेपणारा नाही. शुटिंग असोसिएशनच्या माध्यमातून मी माझे करिअर केले. धनंजय भगत यांनी या शिबिरात १0 रायफल उपलब्ध करून दिल्या आहेत, याचा अकोला आणि विदर्भातील इतर जिल्हय़ातील खेळाडूंना निश्चितच लाभ होईल.