शहरं
Join us  
Trending Stories
1
Anant Garje : "अनैतिक संबंध ठेवणारी महिला...", रुपाली पाटील ठोंबरे यांची गौरी पालवे मृत्यू प्रकरणी संतप्त पोस्ट
2
पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ला; ९ निष्पाप बालकांसह १० जणांचा मृत्यू
3
शनी देव कोपला? भव्य कडे अचानक दिसेनासे झाले; काय आहे दुर्मीळ खगोलीय घटनेमागील रहस्य?
4
इथे २०२५ नाही, २०१८ आहे, सूर्योदय १२ वाजता होतो; ज्वालामुखीची राख याच देशातून भारतात आली
5
स्त्रियांसाठी स्वतःचेच घर बनलेय सर्वात धोकादायक ठिकाण! प्रत्येक १० मिनिटाला महिलेची जवळच्याच माणसाकडून झाली हत्या
6
Priyanka Chaturvedi: भाजलेल्या चण्यांमध्ये 'कर्करोगजन्य' विषारी केमिकल? प्रियंका चतुर्वेदींचं केंद्रीय मंत्र्यांना पत्र!
7
आयटी इंजिनिअर नोकरी गमावली, होम लोनचा हप्ता भरण्यासाठी थेट रॅपिडो ड्रायव्हर बनला!
8
गाड्यांच्या सुरक्षेसाठी 'भारत NCAP 2.0' नियम लवकरच लागू; 'क्रॅश टेस्ट' आता कठीण...
9
'जुबिन गर्ग यांची हत्या झाली!'; आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांचा सिंगापूर मृत्यू प्रकरणावर धक्कादायक दावा
10
GST नंतर आता कर्जही होणार स्वस्त? RBI लवकरच रेपो दरात कपात करण्याची शक्यता; गव्हर्नर म्हणाले..
11
“सत्ताधाऱ्यांची विधाने म्हणजे सत्तेची गुर्मी, निवडणूक आयोग कारवाई का करत नाही?”: वडेट्टीवार
12
IND vs SA 2nd Test : द.आफ्रिकेनं ठेवलं अशक्यप्राय लक्ष्य! टीम इंडियासमोर सामना वाचवण्याचं आव्हान
13
“मार्च २०२६ पासून मीरा–भाईंदरला पूर्ण क्षमतेने सूर्या योजनेचा जल पुरवठा सुरू होणार”: सरनाईक
14
धक्कादायक! 'गुप्त रोग' बरे करण्याच्या नावाखाली भोंदू बाबाने ४८ लाखांना फसवलं; इंजिनीअरची किडनीही फेल 
15
हाय-डिमांड नोकऱ्यांची लिस्ट आऊट! या २५ फील्डमध्ये पडणार पगाराचा जोरदार पाऊस!
16
महानगरपालिका प्रारुप मतदार याद्यांच्या हरकतीची मुदत वाढवा; काँग्रेसचे निवडणूक आयोगाला पत्र
17
सेलिना जेटलीचा पतीवर कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप, ५० कोटींसह मागितला घटस्फोट
18
"हा केवळ ध्वज नाही तर,..." राम मंदिराच्या शिखरावर भगवा फडकावल्यानंतर PM Modi म्हणाले...
19
"सरकार कोणाचेही असो, मानसन्मान पाळायलाच पाहिजे"; सुप्रिया सुळेंची CM-DCM वर टीका
20
दत्त जयंती २०२५: गुरुचरित्र सप्ताह कधीपासून सुरू करावा? पाहा, मान्यता, महत्त्वाच्या गोष्टी
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्ह्यात दोन लाखावर कुटुंबांना मिळणार ‘आयुष्यमान’चे ‘कवच’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 16:08 IST

अकोला: आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेची जिल्ह्यात अंमलबजावणी सुरू करण्यात आली असून, जिल्ह्यातील २ लाख ११ हजार ८८४ गरीब कुटुंबांना या योजनेचे ‘कवच’ मिळणार आहे.

- संतोष येलकर

अकोला: आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेची जिल्ह्यात अंमलबजावणी सुरू करण्यात आली असून, जिल्ह्यातील २ लाख ११ हजार ८८४ गरीब कुटुंबांना या योजनेचे ‘कवच’ मिळणार आहे. संबंधित लाभार्थी कुटुंबांना पाच लाख रुपयांपर्यंतच्या आरोग्य सुविधा मोफत उपलब्ध होणार आहेत.शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेची गत २३ सप्टेंबरपासून जिल्ह्यात अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.या योजनेंतर्गत विविध १ हजार ३०० आजारांचा समावेश असून, योजनेत पात्र लाभार्थी रुग्णांना पाच लाख रुपयांपर्यंत सर्व प्रकारचे उपचार नि:शुल्क उपलब्ध होणार आहेत. सन २०११ च्या सामाजिक व आर्थिक सर्वेक्षणानुसार जिल्ह्यातील नागरी व ग्रामीण भागातील २ लाख ११ हजार ८८४ गरीब कुटुंबांना आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ मिळणार आहे. योजनेत पात्र ठरलेल्या संबंधित कुटुंबातील रुग्णांना विविध गंभीर स्वरूपाच्या आजारांवर मोफत उपचाराच्या सुविधा उपलब्ध होणार आहेत.योजनेत पात्र शहरी-ग्रामीण भागातील असे आहेत कुटुंब!तालुका        शहर                      ग्रामीणअकोला           ३२,०२३             ३३,८५६अकोट             ८,१९९                २३,९४०बाळापूर           ४,३८५                २०,५९७पातूर              २,१३९                १७,९३७तेल्हारा            १,७२५               २२,०६६मूर्तिजापूर       ३,०१३                   १९,७९०बार्शिटाकळी ......                       २२,२१४............................................................एकूण              ५१,४८४                  १,६०,४००दोन शासकीय रुग्णालयात सुविधा उपलब्ध!आयुष्यमान भारत योजना अंमलबजावणीच्या प्रारंभी जिल्ह्यात सध्या लाभार्थी रुग्णांचे अर्ज स्वीकारणे व आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अकोल्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा स्त्री रुग्णालय या दोन शासकीय रुग्णालयांत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.सन २०११ च्या सामाजिक आर्थिक सर्वेक्षणानुसार आयुष्यमान भारत योजनेंतर्गत जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात २ लाख ११ हजार ८८४ कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. योजनेंतर्गत लाभार्थींना सुविधा उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा स्त्री रुग्णालय या दोन शासकीय रुग्णालयांमार्फत लाभार्थी रुग्णांना सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत.-डॉ. अश्विनी खडसे, जिल्हा समन्वयक, आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना

 

टॅग्स :Akolaअकोलाgovernment schemeसरकारी योजनाHealthआरोग्य