आस्था अग्रवाल, प्रज्ज्वल घोगले जिल्ह्यातून अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2017 00:42 IST2017-06-29T00:42:25+5:302017-06-29T00:42:25+5:30

प्रज्ञाशोध परीक्षा : बाल शिवाजीचे सर्वाधिक विद्यार्थी

Aastha Agarwal, Pradhanwala Ghogale district topped the list | आस्था अग्रवाल, प्रज्ज्वल घोगले जिल्ह्यातून अव्वल

आस्था अग्रवाल, प्रज्ज्वल घोगले जिल्ह्यातून अव्वल

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, या परीक्षेत बाल शिवाजी माध्यमिक शाळेचे विद्यार्थी आस्था अभय अग्रवाल आणि प्रज्वल जगन्नाथ घोगले यांनी जिल्ह्यातून अव्वल स्थान पटकावले. प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये बाल शिवाजी शाळेचे सर्वाधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
नौरोसजी वाडीया महाविद्यालय पुणेतर्फे आयोजित महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षेत वर्ग आठवीतून आस्था अभय अग्रवाल हिने राज्यातून १८ वे स्थान पटकावले, तर प्रज्वल जगन्नाथ घोगले हा जिल्ह्यातून पहिला आला. यासोबतच हर्षल अमर गजभिये, यश उज्ज्वल खुमकर, शैलजा प्रशांत लोहिया, रमण उदय थत्ते यांनी विशेष प्रावीण्य प्राप्त केले. राज चंद्रशेखर उपासने, अभिनव ज्ञानेश्वर टोहरे, मानसी अरुण राऊत, गौरी सुधीर मिसुरकर, वेदांत मनोज मरावार, श्रुती अविनाश काळे, चैतन्य शैलेश कुळकर्णी, अथर्व विनोद घाटोळ यांना उत्तेजनार्थ बक्षीस प्राप्त केले. वर्ग नववीचे शर्वरी उमेश रेळे, साक्षी गोपाल सोळंके, यशराज प्रमोद तायडे, रूपेश विजय ठाकरे यांनी विशेष प्रावीण्य मिळविले, तर अथर्व जगदीश पाटील याने उत्तेजनार्थ स्थान प्राप्त केले. वर्ग दहावीचे आरोही रामदास खोडकुंभे जिल्ह्यातून दुसरी, जयेश गजानन चंदन जिल्ह्यातून तिसरा तर सुरभी अनिल देशपांडे, मंदार उमेश कुळकर्णी, अथर्व अजित पाटखेडकर यांनी विशेष प्रावीण्य श्रेणी प्राप्त केली. साक्षी दिलीप पाटकर, ईशा नितीन मोहोड, मृण्मयी नरेंद्र काश्यपे यांनी उत्तेजनार्थ बक्षीस मिळविले आहे.

Web Title: Aastha Agarwal, Pradhanwala Ghogale district topped the list