आरती बानोकार गणलक्ष्मी करंडकाची मानकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 19:14 IST2018-12-22T19:13:29+5:302018-12-22T19:14:07+5:30
अकोल्याच्या आरती बानोकार हिने सर्वोत्कृष्ट अभिनय करित गणलक्ष्मी करंकडकाची मानकरी ठरली.

आरती बानोकार गणलक्ष्मी करंडकाची मानकरी
अकोला: अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मलकापूर - अकोला शाखा आणि श्री शिवाजी महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी गणपतराव जाधव व लक्ष्मीबाई जाधव स्मृती विदर्भस्तरीय गणलक्ष्मी करंडक एकपात्री साभिनय स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत विदर्भातील २५ कलावंत सहभागी झाले होते.यामध्ये अकोल्याच्या आरती बानोकार हिने सर्वोत्कृष्ट अभिनय करित गणलक्ष्मी करंकडकाची मानकरी ठरली. स्पर्धेचे द्वितीय व तृतीय पारितोषिक देखील अकोल्याच्याच मुलींनी पटकाविले.वैदेही बडगे द्वितीय तर ऐश्वर्या फडके तृतीय पुरस्काराची मानकरी ठरली.
वसंत सभागृहात पार पडलेल्या या स्पधेर्चे उदघाटन ज्येष्ठ रंगकर्मी व नाट्य दिगदर्शक संतोष काटे यांच्या हस्ते झाले . यावेळी ज्येष्ठ रंगकर्मी अरुण घाटोल यांची प्रमुख उपस्थिती होती. या स्पर्धेत भंडारा , नागपूर व अकोल्याचे वर्चस्व दिसून आले.अकोल्याच्या आरती बानोकार हिला गणलक्ष्मी करंडक व रंगकर्मी विशाल डीक्कर स्मृतिप्रीत्यर्थ पाच हजार रुपये प्रथम पारितोषिक तर शांताराम जैन स्मृती प्रित्यर्थ तीन हजार रुपये द्वितीय पारितोषिक अकोल्याच्याच वैदेही बडगे हिने पटकावले . वसंतराव रावदेव स्मृती प्रित्यर्थ दोन हजार रुपये तृतीय परितोषिकही अकोल्याच्या ऐश्वर्या फडकेला मिळाले. दादासाहेब रत्नपारखी स्मृती प्रित्यर्थ प्रती स्पर्धक उतेजनार्थ पाचशे रू पये पुरस्कार नागपूरच्या प्रणाली राऊत , भांडाऱ्याचे महेंद्रकुमार गोंडाणे आणि अकोल्याच्या विष्णू निंबाळकर यांना प्रदान करण्यात आले. स्पधेर्चे परीक्षक म्हणून संतोष काटे व अरुण घाटोल यांनी काम पाहिले .
स्पर्धेचा समारोप व बक्षीस वितरण कार्यक्रम श्री शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ रामेश्र्वर भिसे यांच्या अध्यक्षतेत व लोक कवी प्राचार्य डॉ विठठल वाघ, अशोक ढेरे यांच्या उपस्थित पार पडला . या प्रसंगी विठठल वाघ यांनी स्पर्धकांना मार्गदर्शन केले .शाखेचे अध्यक्ष व स्पधेर्चे प्रमुख आयोजक प्रा. मधू जाधव यांनी आपल्या प्रास्ताविकातून स्पर्धा आयोजना मागची भूमिका स्पष्ट केली .पुरस्कार वितरण सोहळ्याचे संचालन बालचंद्र उखळकर यांनी केले.