आलेगाव येथे कर्जाला व दुर्धर आजाराला कंटाळून इसमाची आत्महत्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2018 20:42 IST2018-02-04T20:29:46+5:302018-02-04T20:42:09+5:30
आलेगाव (अकोला): कार्ला येथे दुर्धर आजाराला व मुलीच्या लग्नासाठी काढलेल्या कर्जाला कंटाळून ४५ वर्षीय इसमाने गावाजवळील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना ४ फेब्रुवारी रोजी उघडक ीस आली. दशरथ काशीराम चव्हाण असे मृतकाचे नाव आहे.

आलेगाव येथे कर्जाला व दुर्धर आजाराला कंटाळून इसमाची आत्महत्या!
लोकमत न्यूज नेटवर्क
आलेगाव (अकोला): कार्ला येथे दुर्धर आजाराला व मुलीच्या लग्नासाठी काढलेल्या कर्जाला कंटाळून ४५ वर्षीय इसमाने गावाजवळील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना ४ फेब्रुवारी रोजी उघडकस आली. दशरथ काशीराम चव्हाण असे मृतकाचे नाव आहे.
कार्ला येथील दशरथ काशीराम चव्हाण हे २८ जानेवारीला घरून न सांगता निघून गेले होते. तशी तक्रार पातूर येथे पोलीस स्टेशनला तीन दिवसांपूर्वी देण्यात आली होती. दुर्धर आजार आणि मुलीच्या लग्नासाठी काढलेल्या कर्जाला कंटाळून त्यांनी गावाशेजारी असलेल्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचे ४ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता उघडकीस आले. शेताला पाणी देण्यासाठी सुभाष मुर्तडकर गेले असता त्यांना विहिरीत कुजलेले प्रेत आढळून आले. त्यांनी पातूर पोलीस स्टेशनला कळविले. पोलिसांनी घटनास्थळावर भेट देऊन प्रेत बाहेर काढले. तसेच यावेळी चौकशी केली असता ते प्रेत दशरथ चव्हाण यांचे असल्याचे समोर आले. पुढील तपास पातूर पोलीस करीत आहेत.