आकोटात पोलीस अधीक्षकांच्या पथकाची जुगारावर धाड

By Admin | Updated: December 13, 2014 00:50 IST2014-12-13T00:44:51+5:302014-12-13T00:50:36+5:30

९१ हजारांचा मुद्देमाल जप्त;९ जुगा-यांना अटक व जामिनावर सुटका.

Aakot police superintendent's team junkage raid | आकोटात पोलीस अधीक्षकांच्या पथकाची जुगारावर धाड

आकोटात पोलीस अधीक्षकांच्या पथकाची जुगारावर धाड

आकोट : आकोट शहरातील देशमुख प्लॉट परिसरात खुलेआम सुरू असलेल्या जुगारावर जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने धाड टाकली. यामध्ये ९ जुगार्‍यांवर कारवाई करून ९१ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. त्यांना अटक करून त्यांची जामिनावर सुटकाही करण्यात आली. ही कारवाई ११ डिसेंबरला उशिरा रात्री करण्यात आली.
जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाचे पीएसआय अण्णा खोडेवार यांनी आकोट पोलिसांना थांगपत्ता लागू न देता प्राप्त गुप्त माहितीच्या आधारावर धाड टाकली. यावेळी दिनकर वासुदेव गोंडागरे, असलम खान दाऊद खान, शकीलोद्दीन हफीसोद्दीन, अजमतखाँ दाऊदखाँ, विजय रेवाचंद जेस्वाणी, धनराज तुळशीराम बोरकुटे, राजू केशवराव वानखडे सर्व रा.आकोट व रामाभाऊ नामदेव देशमुख, निजामशहा करीम शहा रा.अंजनगाव यांना ५२ पत्त्यावर जुगार खेळताना रंगेहात पकडले. त्यांच्याकडून ९ मोबाईल, २ मोटारसायकली, १ इन्व्हर्टर बॅटरी, ट्युबलाईट वायर, ताडपत्री, ५२ ताश पत्ते व नगदी ८ हजार ६७0 रुपये, असा एकूण ९१ हजार १२0 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आकोट शहर पोलीस स्टेशनमध्ये सर्वांविरुद्ध मुंबई जुगार अँक्ट १२ नुसार गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. विशेष म्हणजे यापूर्वी जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने आकोट शहरात विविध ठिकाणी वरली मटक्यावर धाडी टाकून कारवाई केली आहे.

Web Title: Aakot police superintendent's team junkage raid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.