ओबीसींची जनगणना करा! OBC माेर्चाची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक
By राजेश शेगोकार | Updated: April 17, 2023 18:28 IST2023-04-17T18:28:28+5:302023-04-17T18:28:46+5:30
ओबीसींची जनगणना करा या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

ओबीसींची जनगणना करा! OBC माेर्चाची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक
अकाेला : भाजप सरकार देशातील जनावरांची गणना करते, मात्र ओबीसीची जनगणना करत नाही,असा आराेप करत ओबीसी जनगणना करा, खासगी क्षेत्रात एससी. एसटी, ओबीसी यांना आरक्षण लागू करा, यासह अन्य मागण्यांसाठी साेमवार १७ एप्रिल राेजी राष्ट्रीय पिछडा वर्ग अर्थात ओबीसी माेर्चातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर माेर्चा काढण्यात आला.
ओबीसी माेर्चातर्फे दिलेल्या निवेदनात नमुद केले आहे की, ओबीसींची जनगणना करण्याची गरज आहे, केवळ ओबीसींचा राजकारणासाठी वापर करायचा, ओबीसींच्या अपमान झाल्याचा कांगावा करायचा हा केंद्र सरकारचा उद्याेग असल्याचा आराेप केला आहे. ओबीसींच्या हितासाठी ओबीसींची जनगणना करा, जुनी पेन्शन याेजना पूर्ववत लागू करण्यात यावी.
इव्हीएम घोटाळा व एनआरसी, एनपीआर, सीएएच्या विरोधात कायदा करावा, विकास, पर्यावरण, जनावरांच्या संरक्षणाच्या नावाखाली आदीवासीना विस्थापित करणे थांबवा, शेतकऱ्यांना एमएसपीची हमी देण्यात यावी, एससी, एसटी विद्यार्थ्यांची राबविण्यात आलेली शिष्यवृत्ती तातडीने वितरित करा अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.माेर्चाला अशोक वाटिका येथून सुरूवात झाली हाेती. यामध्ये याेगेश जायले, ॲड सारंग निखाडे, मुरलीधर पखाले, नंदकिशाेर पवार, शशिकांत सिरसाट, सूर्यभान उंबरकर, धम्मपाल खंडेराव, केशव भटकर, सतिश अवचार, गजानन पद्मणे, प्रवीणा भटकर, शाम अवचार, इकबाल शाहिद, महादेव घाेसे आदी सहभागी झाले.