अकोला येथील मोर्णा नदीत चारवर्षीय बालक वाहून गेला
By Atul.jaiswal | Updated: July 31, 2024 17:34 IST2024-07-31T17:34:22+5:302024-07-31T17:34:33+5:30
Akola News: मंगळवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे अकोला जिल्ह्यातून वाहणाऱ्या मोर्णा नदीला पूर आला आहे. या पुरात अकोला शहरातील एक चार वर्षीय बालक नदी पात्रात वाहून गेल्याची घटना बुधवारी दुपारी घडली.

अकोला येथील मोर्णा नदीत चारवर्षीय बालक वाहून गेला
- अतुल जयस्वाल
अकोला - मंगळवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे अकोला जिल्ह्यातून वाहणाऱ्या मोर्णा नदीला पूर आला आहे. या पुरात अकोला शहरातील एक चार वर्षीय बालक नदी पात्रात वाहून गेल्याची घटना बुधवारी दुपारी घडली.
अकोला शहरातून वाहणाऱ्या मोर्णा नदीला आलेला पूर पाहण्यासाठी शिवसेना वसाहतमधील सचिन बोके हे चार वर्षीय मुलगा जयला घेऊन राजेश्वरसेतू पुलावर आले होते. पुर बघत असतानाच गाडी घसरल्याने तोल जाऊन जय थेट नदीच्या वाहत्या पात्रात पडला. वडिलांच्या डोळ्यादेखत मुलगा वाहून गेला. या मुलाला शोधण्यासाठी आपतकालीन पथक व प्रशासनातर्फे प्रयत्न केले जात आहे. दरम्यान, दगडपारवा प्रकल्पातून नदी पात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात आल्यामुळे मोर्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.