युवतीस अश्लील शिवीगाळ केल्याप्रकरणी युवकाविरुद्ध गुन्हा दाखल

By नितिन गव्हाळे | Updated: February 27, 2023 13:04 IST2023-02-27T13:04:45+5:302023-02-27T13:04:54+5:30

भावाच्या अंगावर फावडे घेऊन मारायला आला आणि जीवे मारण्याची धमकी दिली.

A case has been registered against the youth for sexually abusing a young woman at Akola | युवतीस अश्लील शिवीगाळ केल्याप्रकरणी युवकाविरुद्ध गुन्हा दाखल

युवतीस अश्लील शिवीगाळ केल्याप्रकरणी युवकाविरुद्ध गुन्हा दाखल

अकोला : भिंत का पाडली,या कारणावरून शेजारी राहणाऱ्या युवकाने युवतीसह तिच्या आईला अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणात खदान पोलिसांनी शुक्रवारी गुन्हा दाखल केला.

खडकीतील जिल्हा परिषद कॉलनीत राहणाऱ्या एका युवतीने दिलेल्या तक्रारीनुसार २२ फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास घराशेजारी राहणारा आरोपी रवी भगवंत काकड याने घरासमोर येऊन युवतीला व तिच्या आईला अश्लील शिवीगाळ केली आणि भिंत का पाडली अशी विचारणा केली. तसेच भावाच्या अंगावर फावडे घेऊन मारायला आला आणि जीवे मारण्याची धमकी दिली. या युवकापासून आमच्या कुटुंबाच्या जीविताला धोका असल्याचेही या युवतीने तक्रारीत म्हटले आहे.

Web Title: A case has been registered against the youth for sexually abusing a young woman at Akola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.