3 वर्षीय बालकाच्या नाकात तुरीचा दाणा गेल्याने मृत्यू

By आशीष गावंडे | Published: January 24, 2024 06:30 PM2024-01-24T18:30:42+5:302024-01-24T18:31:43+5:30

अकोला : तुरीचे दाणे खात असताना अचानकपणे नाकात तुरीचा दाणा अडकल्याने एका तीन वर्षीय चिमुकल्याचा तडफडून मृत्यू झाल्याची घटना ...

A 3-year-old boy died after a thorn stuck in his nose | 3 वर्षीय बालकाच्या नाकात तुरीचा दाणा गेल्याने मृत्यू

3 वर्षीय बालकाच्या नाकात तुरीचा दाणा गेल्याने मृत्यू

अकोला: तुरीचे दाणे खात असताना अचानकपणे नाकात तुरीचा दाणा अडकल्याने एका तीन वर्षीय चिमुकल्याचा तडफडून मृत्यू झाल्याची घटना दहीहंडा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पाटसुल या गावात २३ जानेवारी रोजी रात्री घडली. या घटनेमुळे गावात शोककळा पसरून एकही चूल पेटली नाही. 

प्राप्त माहितीनुसार, २३ जानेवारी रोजी आठच्या सुमारास घरात आजी तुरीचे दाने काढत असताना त्यांचा नातू योगिराज अमोल ईसापुरे (३) हा आजीजवळ आला. आजीने काढून ठेवलेल्या तुरीचे दाने त्या चिमुकल्याने मुठीत घेतले. आणि तोंडात ओतले. त्यातील एक दाना  मुलाच्या नाकात गेला. त्याला लगेच श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. तो तडफडत असल्याचे पाहून कुटुंबीयांनी त्याला तातडीने रुग्णालयात भरती करण्याचा प्रयत्न केला;परंतु वाटेतच त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली.

Web Title: A 3-year-old boy died after a thorn stuck in his nose

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Akolaअकोला