२५ वर्षीय तरुणानं Video सुरू ठेवत प्यायलं विष; रुग्णालयात उपचार सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2023 16:28 IST2023-03-27T16:28:36+5:302023-03-27T16:28:55+5:30
चान्नी पोलीस स्टेशन हद्दीतील सावरगाव येथील घटना

२५ वर्षीय तरुणानं Video सुरू ठेवत प्यायलं विष; रुग्णालयात उपचार सुरू
नासीर शेख
खेट्री - अकोला जिल्ह्याच्या पातुर तालुक्यातील चान्नी पोलीस स्टेशन अंतर्गत अतिदुर्गम भागातील सावरगाव येथील २५ वर्षीय तरुणाचा विष प्राशन करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. शुभम रामचौरे असे गंभीर झालेल्या तरुणाचे नाव आहे. सध्या त्याच्यावर शासकीय रुग्णालय अकोला येथे उपचार सुरू आहे.
व्हिडिओ काढून विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना शनिवार दि.२५ मार्च रोजी च्या संध्याकाळी घडली असून विष प्राशन करतानाचा व्हिडिओ सोमवारी व्हायरल झाल्याने सदर घटना उघडकीस आली आहे.