991 students give the main science and science exam | ९९१ विद्यार्थ्यांनी दिली ज्ञान-विज्ञान मुख्य परीक्षा

९९१ विद्यार्थ्यांनी दिली ज्ञान-विज्ञान मुख्य परीक्षा


अकोला: शिक्षणाधिकारी कार्यालय, विज्ञान अध्यापक मंडळाच्यावतीने ६ आॅक्टोबर रोजी जिजाऊ कन्या विद्यालय, न्यू इंग्लिश हायस्कूल या दोन केंद्रांवर जिल्ह्यातून ९९१ विद्यार्थ्यांनी ज्ञान-विज्ञान मुख्य परीक्षा दिली.
या परीक्षेत सीबीएसई, आयसीएसई, राज्य शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमानुसार आधारित रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, पर्यावरण, संगणक विषयांवर आधारित ५0 गुणांची बहुपर्यायी परीक्षा इ. ५ ते ६, इ. ७ ते ८ आणि इ. ९ ते १0 अशा तीन गटात पार पडली. या अंतिम परीक्षेतून एकूण विद्यार्थ्यांपैकी १0 टक्के विद्यार्थी गटनिहाय निवडून त्यांचे शिबिर घेण्यात येणार आहे. शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना शास्त्रज्ञांसोबत संवाद, विज्ञान प्रतिकृती बनविणे यावर मार्गदर्शन होईल. परीक्षा केंद्राला उपशिक्षणाधिकारी दिनेश तरोळे, मुख्याध्यापक संघाचे विदर्भ अध्यक्ष शत्रुघ्न बिरकड, जिल्हाध्यक्ष बळीराम झामरे, विजुक्टाचे प्रांताध्यक्ष डॉ. अविनाश बोर्डे, मुख्याध्यापक संघाचे सचिव दिनेश तायडे, प्राचार्य माधव मुन्शी, विज्ञान अध्यापक मंडळाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र भास्कर, डीआयईसीपीडीच्या तृप्ती देशपांडे यांनी भेट दिली. परीक्षेसाठी शशिकांत बांगर, नितीन तिवारी, अनिल जोशी, मुरलीधर थोरात, सुरेश किरतकर, ओरा चक्रे, सुनील वावगे, मनीष निखाडे, विलास घुंगड, पी.पी. चव्हाण, संतोष जाधव, किरण देशमुख, सुरेखा माकोडे, लंके, प्रमोद पांडे, जायले गुरुजी, के.पी. पाटील यांचे सहकार्य लाभले. (प्रतिनिधी)
 

 

Web Title: 991 students give the main science and science exam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.