गोवंशाचे ९६ किलो मांस जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2016 00:05 IST2016-01-29T00:05:16+5:302016-01-29T00:05:16+5:30
एकास न्यायालयीन कोठडी

गोवंशाचे ९६ किलो मांस जप्त
अकोला: सिटी कोतवाली पोलिसांनी गुरुवारी वाशिम स्टॅण्ड परिसरात धाडसत्र राबवून हुमायूं रोडवर मांसविक्री करणार्या दुकानांमधून गोवंशाचे ९६ किलो मांस जप्त केले. या कारवाईत पाच जणांवर कारवाई करण्यात आली असून, एकास न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. वाशिम स्टॅण्ड परिसरात गोवंशाच्या मांसाची विक्री होत असल्याच्या माहितीवरून सिटी कोतवाली पोलिसांनी गुरुवारी परिसरात धाडसत्र राबविले. यावेळी कारवाई करीत पोलिसांनी मोहम्मद इमरान मोहम्मद इरफान कुरैशी, शेख रहमान शेख चाँद, अब्दुल जमील अब्दुल गनी, रियाज अहमद कुरेशी गुलाम नबी, शेख वाजीद शेख लुबमान या पाच जणांना अटक केली. पोलीस उपनिरीक्षक डॉ. बालाजी सावंडकर यांच्या तक्रारीवरून आरोपींविरुद्ध कलम ४२९ आणि महाराष्ट्र प्राणी सुरक्षा कायद्यांतर्गत कलम ५ (क-९) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले. सिटी कोतवाली पोलिसांनी पाचही आरोपींना गुरुवारी दुपारनंतर न्यायालयात हजर केले.