बाजार समिती निवडणुकीत ९५.७0 टक्के मतदान

By Admin | Updated: September 7, 2015 01:42 IST2015-09-07T01:42:30+5:302015-09-07T01:42:30+5:30

४८ उमेदवारांचे भाग्य मतपेट्यांमध्ये सीलबंद; उद्या निकाल.

9 5.70 percent voting in the market committee elections | बाजार समिती निवडणुकीत ९५.७0 टक्के मतदान

बाजार समिती निवडणुकीत ९५.७0 टक्के मतदान

अकोला : अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ संचालक पदांच्या निवडणुकीसाठी रविवारी १९ केंद्रांवर मतदान घेण्यात आले. या निवडणुकीत सरासरी ९५.७0 टक्के मतदान झाले असून, निवडणूक रिंगणातील ४८ उमेदवारांचे भाग्य मतपेट्यांमध्ये सीलबंद झाले. मंगळवारी होणार्‍या मतमोजणीत उमेदवारांच्या भाग्याचा निकाल जाहीर होणार आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सेवा सहकारी संस्था मतदारसंघातून ११, ग्रामपंचायत मतदारसंघातून ४, व्यापारी व अडते मतदारसंघातून २ आणि हमाल व मापारी मतदारसंघातून १ अशा एकूण १८ संचालकांची निवड करण्यासाठी निवडणूक घेण्यात येत आहे. चारही मतदारसंघातून १८ जागांसाठी ४८ उमेदवार निवडणूक लढवित आहेत. या निवडणुकीसाठी रविवार, ६ सप्टेंबर रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत तालुक्यातील १९ केंद्रांवर मतदान घेण्यात येणार आहे. पारंपरिक पद्धतीने मतपत्रिकांद्वारे मतदान घेण्यात आले. या निवडणुकीत सरासरी ९५.७0 टक्के मतदान झाले असून, त्यामध्ये ४८ उमेदवारांचे भाग्य मतपेट्यांमध्ये सीलबंद झाले. या निवडणुकीची मतमोजणी मंगळवार, ८ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजतापासून अकोल्यातील मंगळरुळपीर रोडवरील, खदानस्थित शासकीय गोदाम येथे सुरू होणार असून, दुपारपर्यंत निवडणुकीचे निकाल जाहीर होणार आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अकोल्याचे उपविभागीय अधिकारी संजय खडसे व साहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून साहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी राजेंद्र जाधव काम पाहत आहेत.

Web Title: 9 5.70 percent voting in the market committee elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.