ट्रकने दुचाकीला उडविले;आठ वर्षीय चिमुकला ठार,दोघे जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2020 05:57 PM2020-03-12T17:57:14+5:302020-03-12T17:58:09+5:30

ट्रकने दुचाकीला उडविले; आठ वर्षीय चिमुकला ठार,दोघे जखमी झाले.

8-year-old boy killed, two injured in truck accident | ट्रकने दुचाकीला उडविले;आठ वर्षीय चिमुकला ठार,दोघे जखमी

ट्रकने दुचाकीला उडविले;आठ वर्षीय चिमुकला ठार,दोघे जखमी

Next
ोरगाव मंजू: बोरगाव मंजू पोलिस ठाण्याच्या हद्दीतील राष्ट्रीय महामार्गावर वणीरंभापुर नजीक भरधाव वेगाने जाणाऱ्या टॅंकर ट्रकने दुचाकीला उडविले या अपघातात दोन जण जखमी झाले,तर एक आठ वर्षांचा चिमुकला ठार झाल्याची घटना गुरुवारी सकाळी दरम्यान घडली,सम्राट वानखडे असे मृत बालकाचे नाव आहे,प्राप्त माहितीनुसार, कोठारी येथील निशांत गवई हे आपल्या मोटारसायकल क्रमांक एम.एच.३०बी.जी.३००६ वरून बहीण सुजाता पवन वानखडे, मुलगा सम्राट पवन वानखडे (वय आठ वर्ष) हे तिघे कोठारी येथुन बोरगाव मंजू येथे येत असताना बोरगाव मंजू कडुन भरधाव वेगाने जाणाऱ्या टॅंकर ट्रक क्रमांक एम.एच.४८ए.वाय,०३९६ या वाहनाने दुचाकीला उडविले,या अपघातात निशांत गवई, सुजाता वानखडे,सम्राट वानखडे हे गंभीर जखमी झाले, दरम्यान घटनेची माहिती मिळताच बोरगाव मंजू ठाणेदार हरिश गवळी सह पोलीसांनी घटना स्थळावर धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला, दरम्यान गंभीर जखमी झालेल्या निशांत गवई, सुजाता वानखडे,सम्राट वानखडे उपचारासाठी अकोला येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले असता सम्राट वय आठ वर्ष यास डाॅक्टरांनी मृत घोषित केले, या घटनेची बोरगाव मंजू पोलिस ठाण्यात नातेवाईकांनी फिर्याद दिली वरून बोरगाव मंजू पोलिस सदर ट्रक चालका विरुद्ध गुन्हा कलम २७९,३३८,३०४,(अ)आय.पि.सी.१८४ गुन्हा दाखल करुन सदर ट्रक सह चालकास ताब्यात घेऊन पुढील तपास ठाणेदार हरिश गवळी सह पोलीस करत आहेत,

Web Title: 8-year-old boy killed, two injured in truck accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.