आकोटात गॅस एजन्सी देण्याचे आमिष दाखवून आठ लाखांनी फसवणूक

By Admin | Updated: December 10, 2014 01:26 IST2014-12-10T01:26:28+5:302014-12-10T01:26:28+5:30

तिघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल.

8 lakhs fraud by showing lacuna for gas agency | आकोटात गॅस एजन्सी देण्याचे आमिष दाखवून आठ लाखांनी फसवणूक

आकोटात गॅस एजन्सी देण्याचे आमिष दाखवून आठ लाखांनी फसवणूक

आकोट: आकोट येथे हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशन कंपनीची गॅस एजन्सी नोंदवून देतो, असे सांगून आकोट येथील दोघांकडून आठ लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी औरंगाबाद येथील तिघांविरुद्ध आकोट ग्रामीण पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्थानिक विजयनगर येथील रहिवासी रवींद्र श्रीकृष्ण रेळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, निखिल संजय बोरोकार, संजय ज्ञानदेव बोरोकार, उमा संजय बोरोकार हे औरंगाबाद येथील रहिवासी आहेत. ते आपले भाचा, जावई व मामेबहीण असून, त्यांनी आकोट येथे येऊन हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशनमार्फत चालविण्यात येणार्‍या गॅस एजन्सीचे आकोट येथे वितरक नेमावयाचे आहे, असे आपणास सांगितले. औरंगाबाद येथील ऑफिसमध्ये ओळख असल्याने आम्ही तुमच्या नावाने एजन्सी नोंदवून देतो, असेही सांगितले. त्यानुसार आपण आपले भावसासरे गणेश प्रभाकर जायले (रा. आसरा कॉलनी आकोट) यांच्याशी चर्चा करून दोघांनीही मिळून गॅस एजन्सी घ्यायचे ठरविले. त्यानुसार १४ ऑक्टोबर २0१३ रोजी निखिल, संजय व उमा हे गॅस एजन्सी देण्यासाठी आपल्या घरी आले. यावेळी त्यांनी एजन्सी चालू करण्याकरिता ९ ते १0 लाख रुपये खर्च येईल. त्यानंतर याबाबतचे कागदपत्र हस्तगत करून देऊ, असे सांगितले. त्यानुसार या कामाकरिता आपले भावसासरे जायले यांनी त्यांचा प्लॉट विकला व दोघांनी मिळून आठ लाख रुपयांची रक्कम १८ मार्च २0१४ रोजी औरंगाबाद येथून आलेल्या बोरोकार कुटुंबीयांना दिली.

Web Title: 8 lakhs fraud by showing lacuna for gas agency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.