शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
3
'मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली'; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
4
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
5
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
6
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
7
Sara Tendulkar : सारा तेंडुलकर आता कोरियन ब्युटी ब्रँडची ॲम्बेसेडर; कोणत्या प्रोडक्टची करणार जाहिरात?
8
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
9
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
10
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
11
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
12
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
13
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
14
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
15
अमेठीत २५ वर्षांत प्रथमच मैदानात नसेल गांधी घराणे; बालेकिल्ल्यातून काॅंग्रेसने उमेदवार बदलला, भाजप नेत्यांचे टीकास्त्र
16
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
17
Akshaya Tritiya 2024: चैत्रगौरीला निरोप देताना कुंकवाची पावलं काढा आणि 'पुनरागमनायच' म्हणा; कारण...
18
खासदारांना डावलून आमदार रिंगणात, नव्या चेहऱ्यांमुळे चुरस; रणनीती ठरणार का यशस्वी?
19
'ही' साऊथ अभिनेत्री, जी प्रेमासाठी बनली वयानं २७ वर्ष मोठ्या असलेल्या माजी CM ची दुसरी पत्नी
20
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल

वर्‍हाडात आतापर्यंत ७८ टक्के पाऊस!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 1:41 AM

अकोला : राज्यातील अनेक भागात धो-धो पाऊस सुरू  असताना वर्‍हाडातील (पश्‍चिम विदर्भ)पाच जिल्हय़ात अद्याप पूरक   पाऊस न झाल्याने मोठे, मध्यम व लघु प्रकल्पाच्या जलपातळीत अपेक्षित वाढ झाली नाही. या सर्व धरणांत आजमितीस ४२ टक्के जलसाठा आहे. तसेच पावसाळ्य़ाच्या चार महिन्यांत आतापर्यंत ७८ टक्के पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान,अधून-मधून पडणारा पाऊस  पिकांना संजीवनी देणारा ठरला आहे.

ठळक मुद्देमोठे, मध्यम, लघु प्रकल्पात एकूण ४२.१६ टक्के जलसाठा अप्पर वर्धाचे पाणी सोडणार

राजरत्न सिरसाट । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : राज्यातील अनेक भागात धो-धो पाऊस सुरू  असताना वर्‍हाडातील (पश्‍चिम विदर्भ)पाच जिल्हय़ात अद्याप पूरक   पाऊस न झाल्याने मोठे, मध्यम व लघु प्रकल्पाच्या जलपातळीत अपेक्षित वाढ झाली नाही. या सर्व धरणांत आजमितीस ४२ टक्के जलसाठा आहे. तसेच पावसाळ्य़ाच्या चार महिन्यांत आतापर्यंत ७८ टक्के पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान,अधून-मधून पडणारा पाऊस  पिकांना संजीवनी देणारा ठरला आहे.यावर्षी सुरुवातीपासून पावसाने वर्‍हाडाकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे पेरण्यांनाही एक ते दीड महिने उशीर झाला आहे. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला पाऊस पडला, त्यानंतर दीर्घ खंड पडला. सप्टेंबर महिन्यात अधून-मधून पाऊस होत आहे. त्यामुळे धरणांच्या एकदमच खालावलेल्या स्थितीत अल्पशी सुधारणा झाली आहे.वर्‍हाडात नऊ मोठे सिंचन प्रकल्प असून, त्यामध्ये आजमितीस ५१.0९ टक्के जलसाठा आहे. तसेच २३ मध्यम प्रकल्प आहेत, त्यामध्ये ४३.८0 टक्के जलसाठा उपलब्ध आहे.तर ४५२ लघु प्रकल्प आहेत.त्यात २७.९२ टक्के जलसाठा आहे. या सर्व जलसाठय़ाची सरासरी टक्केवारी ही ४२.१६ टक्के एवढी आहे. विशेष म्हणजे बुलडाणा जिल्हय़ात बर्‍यापैकी पाऊस झाल्याने खडकपूर्णा धरणात शून्य टक्के जलसाठा होता तो ५.५ टक्के एवढा वाढला आहे.दरम्यान, १ जून ते २१ सप्टेंबरपर्यंत ७८ टक्के पावसाची नोंद झाली असून, बुलडाणा जिल्हय़ात आतापर्यंत ६२३ मि.मी.अपेक्षित होता, येथे ६४५.७ मि.मी. म्हणजे १0४ टक्के पाऊस झाला आहे. अकोला जिल्हय़ात ५३३.६ मि.मी. ८२ टक्के पाऊस झाला आहे. वाशिम जिल्ह्यात ५७६.९ मि.मी. ७८ टक्के पावसाची नोंद झाली आहे. अमरावती जिल्हय़ात ५३४.९ मि.मी. ७0 टक्के पावसाची नोंद झाली आहे. यवतमाळ जिल्हय़ात तर ५५५.२ मि.मी.६५ टक्केच पाऊस झाला आहे. या पाच जिल्हय़ात आतापर्यंत ७२८.८ मि.मी. पाऊस अपेक्षित होता आजमितीस ५६९.३ मि.मी. पाऊस झाला आहे.

उध्र्व वर्धा धरणाचे पाणी सोडणार दरम्यान, अमरावती जिल्हय़ातील उध्र्व वर्धा धरणाची जलाशय पातळी ३४१.८७ मीटर असून,२१ सप्टेंबर रोजी या धरणात ६२२.२९ दशलक्ष घनमिटर ९३ टक्के जलसाठा संचयीत झाला आहे. सप्टेंबर अखेरपर्यंत ३४२.५0 मीटरपर्यंतच धरण भरायचे असल्याने येत्या ४८ तासात धरणातील पाणी नदी पात्रात सोडावे लागणार आहे. त्यामुळे नदीकाठी राहणार्‍या नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन उध्र्व वर्धा धरण उपविभाग २ च्या अभियंत्यांनी केले आहे.

पावसाची तूट !वर्‍हाडात अकोला येथे पावसाची २0 टक्के तूट असून, अमरावती २८ टक्के, यवतमाळ ३२ टक्के, वाशिम २६ टक्के, भंडारा २0 टक्के, गोंदिया ३६ टक्के,चंद्रपूर ३२ टक्के, गडचिरोली येथे २२ टक्के तूट आहे.

९६ टक्के पेरणीया विभागात सरासरी ९६ टक्के पेरणी झाली आहे. यामध्ये अर्धरब्बी, रब्बीचेही पीक आहे. बुलडाणा जिल्हय़ात ९८ टक्के, अकोला ९0 टक्के, वाशिम ९७ टक्के, अमरावती ९३ तर यवतमाळ जिल्हय़ात १0१ टक्के पेरणी झालेली आहे.-

अकोला आरटीओला अवैधरीत्या जमीन वाटपलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अकोला येथे मुलींच्या शाळेकरिता राखीव जमीन प्रादेशिक परिवहन कार्यालयासाठी देण्याच्या निर्णयाविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. न्यायालयाने राज्य शासन व महानगरपालिकेला नोटीस बजावून यावर ३ ऑक्टोबरपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. गिरधर हिरवानी असे याचिकाकर्त्याचे नाव आहे. रेल्वे मालधक्का परिसरात नझुल शीट क्र. ४९-अ मधील प्लॉट क्र. ११/१ व १३/१ हे भूखंड मुलींच्या शाळेकरिता राखीव आहेत. महानगरपालिकेने हे भूखंड प्रादेशिक परिवहन कार्यालयासाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. ही जमीन महसूल विभागाची आहे. असे असताना वादग्रस्त निर्णयापूर्वी महसूल विभागाची परवानगी घेण्यात आली नाही. त्यामुळे निर्णय अवैध असून तो रद्द करण्यात यावा असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. याचिकाकर्त्यातर्फे अँड. शंतनू खेडकर यांनी बाजू मांडली.