७६ वर्षीय वृद्धेवर बलात्कार
By Admin | Updated: April 10, 2015 23:41 IST2015-04-10T23:41:07+5:302015-04-10T23:41:07+5:30
सिंदखेडराजा तालुक्यातील माळखेड येथील घटना.

७६ वर्षीय वृद्धेवर बलात्कार
सिंदखेडराजा (बुलडाणा): माळखेड येथील एका ७६ वर्षीय महिलेवर २१ वर्षांच्या युवकाने बलात्कार केल्याची घटना सिंदखेडराजा तालुक्यातील माळखेड येथे ९ एप्रिल रोजी रात्री उशिरा घडली. आरोपीस साखरखेर्डा पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. किशोर दुलचंद ब्राम्हणे असे त्याचे नाव आहे. किशोर गुरुवारी रात्री गावातीलच एका ७६ वर्षीय महिलेच्या घरात घुसला. वृद्धेने त्याला हटकले असता, त्याने चाकूचा धाक दाखवून तिच्यावर बलात्कार केला. दरम्यान महिलेचा आवाज ऐकून युवकाची आई आणि भाचा घटनास्थळी धावत आले. त्यांनी किशोरला अडविण्याचा प्रयत्न केला; मात्र किशोरने त्यांनाही मारहाण करून हाकलून लावले. पीडित महिलेने यासंदर्भात साखरखेर्डा पोलीस ठाण्यात शुक्रवारी सकाळी तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी किशोरला अटक केली आहे.