सीसीआयकडे ७५ लाख कापसाच्या गाठी पडून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2020 11:37 IST2020-09-03T11:37:21+5:302020-09-03T11:37:34+5:30
कापसाची निर्यात बंद झाल्याने तसेच आता सीसीआयने कापसाचे वाढविलेले भाव लक्षात घेता कापसाला मागणी नसल्याचीही माहिती सूत्रांनी दिली.

सीसीआयकडे ७५ लाख कापसाच्या गाठी पडून
अकोला : कॉटन कार्पोरेशन आॅफ इंडिया म्हणजेच सीसीआयकडे यावर्षी तब्बल ७५.८० लाख कापसाच्या गाठी पडून विक्नीअभावी पडून आहेत. कोरोनामुळे भारतातून होणारी कापसाची निर्यात बंद झाल्याने तसेच आता सीसीआयने कापसाचे वाढविलेले भाव लक्षात घेता कापसाला मागणी नसल्याचीही माहिती सूत्रांनी दिली.
यावर्षी सीसीआयने १०७.०० लाख गाठी कापसाची खरेदी केली. सीसीआयकडे जुना ९.२४ लाख गाठी कापूस पडून होता, यामध्ये पणन महासंघाने घेतलेल्या कापसाची भर पडली. पणन महासंघााने १९.६० लाख गाठी कापूस खरेदी केला होता. यामधून ६०.०४ लाख गाठी कापूस विकला गेला होता. दरम्यानच्या काळात कोरोनाचा उद्नेक झाल्यानंतर देशभरातील निर्यात बंद झाली. कापूस बाजारात चीन हा भारताचा सर्वात मोठा निर्यातदार देश आहे. त्यातच आता भारताचे राजकीय संबंध बिघडल्याने चीनला निर्यात होणाऱ्या १५ लाखांपैकी दहा लाख गाठी या पडून राहिल्या. त्यामुळे निर्यातदारांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. यासह कापसापासून तयार होणाºया यान (सूत)चीही निर्यात थांबली आहे, तर दुसरीकडे सर्वच प्रकारच्या व्यवसाय, उद्योगधंद्यांवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. कॉटन क्षेत्रावरदेखील मोठा परिणाम झाला असून, त्याचा फ टका कापसाच्या विक्नीवर झाला आहे.
सीसीआयने आता ठोक खरेदीवर भावात सवलत दिली आहे; मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात आपल्या कापसाचा भाव हा सर्वाधिक असल्यानेही मागणीत घट झाली आहे. आता अनलॉकची प्नक्निया सुरू झाल्याने कापसाची मागणी वाढण्याची शक्यता आहे.
बसंत बाछुका, उद्योजक, अकोला.