शहरं
Join us  
Trending Stories
1
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
2
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी मैदानात...
3
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
4
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
5
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
6
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
7
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
8
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
9
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
10
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
11
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
12
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
13
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
14
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
15
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
16
...जेव्हा मगरीने भरलेल्या तुडुंब नदीत आईनेच मुलाला फेकून दिले
17
सरकारच्या अनुदानामुळे १५ लाख ईव्हींची विक्री; फेम-२ योजनेतील ९० टक्के निधीचा पाच वर्षांत विनियोग
18
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
19
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार
20
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 

एलईडीचे ७४ टक्के काम पूर्ण; तरीही अंधाराची समस्या कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 1:35 PM

कंत्राटदाराने आजवर ७४ टक्के काम पूर्ण केल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात असला, तरी मुख्य रस्त्यांसोबतच प्रभागातील अंतर्गत रस्त्यांवर अंधाराची समस्या कायम असल्याचे चित्र दिसून येत आहे.

अकोला: महापालिका प्रशासनामार्फत शहरात २० कोटी रुपयांतून एलईडी पथदिव्यांची कामे युद्धस्तरावर सुरू आहेत. संबंधित कंत्राटदाराने आजवर ७४ टक्के काम पूर्ण केल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात असला, तरी मुख्य रस्त्यांसोबतच प्रभागातील अंतर्गत रस्त्यांवर अंधाराची समस्या कायम असल्याचे चित्र दिसून येत आहे. दुसरीकडे पथदिव्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी झोननिहाय नियुक्त केलेल्या चार कंत्राटदारांवर देयकापोटी लाखो रुपयांची उधळण होत असली, तरी पथदिव्यांची समस्या ‘जैसे थे’ आहे. एकूणच, पथदिव्यांच्या संदर्भात विद्युत विभागाचा कारभार हवेत सुरू असून, सत्ताधारी भाजपा ढिम्म असल्याचा सूर अक ोलेकरांमध्ये उमटू लागला आहे.सोडियम पथदिव्यांमुळे मनपाच्या वीज देयकात प्रचंड वाढ होत असल्याची सबब पुढे करीत २००६ मध्ये तत्कालीन सत्ताधारी भाजपाने ‘सीएफएल’ पथदिव्यांना प्राधान्य दिले होते. प्रशासनाने सीएफएल पथदिव्यांसाठी एशियन नामक कंपनीसोबत २०१३ पर्यंत करारनामा केला. मनपाच्या वीज देयकात घसरण झाल्याचा दावा केला जात असला, तरी सीएफएलच्या अंधुक उजेडामुळे अकोलेकर हैराण झाले होते. त्यात भरीस भर कंपनीचे देयक थकीत राहत असल्यामुळे कंपनीनेसुद्धा पथदिवे देखभाल दुरुस्तीसाठी आखडता हात घेतला. अंधुक उजेडावर उपाय म्हणून आ. गोवर्धन शर्मा, आ. रणधीर सावरकर यांनी लख्ख उजेड देणाऱ्या एलईडी पथदिव्यांसाठी शासनाकडे निधीची मागणी केली. गतवर्षी शासनाने एलईडीसाठी १० कोटींचा निधी मंजूर केला. त्यामध्ये मनपाने चौदाव्या वित्त आयोगातून १० कोटींची तरतूद करीत एकूण २० कोटी रुपयांतून एलईडी पथदिव्यांसाठी निविदा प्रक्रिया राबविली.‘टायमर’ बिघडले; विद्युत विभाग झोपेतएकीकडे शहरात एलईडीच्या कामांचा गवगवा केला जात असतानाच दुसरीकडे पथदिव्यांचे ‘टायमर’ बिघडल्यामुळे की काय, पथदिव्यांचा बोजवारा उडाल्याचे चित्र आहे. मुख्य रस्त्यांवरील पथदिवे दिवसा सुरू अन् रात्री बंद राहत असल्याने महापालिकेने नियुक्त केलेले झोननिहाय कंत्राटदार दिवसभर करतात तरी काय, असा सवाल उपस्थित होत आहे. कंत्राटदारांवर कारवाई होत नसल्यामुळे विद्युत विभाग संशयाच्या भोवºयात सापडला आहे.२४ तासांत दुरुस्ती नाहीच!नादुरुस्त पथदिव्यांच्या तक्रारीसाठी मनपात स्वतंत्र कक्ष आहे. नागरिकांनी तक्रार केल्यास चोवीस तासांच्या आत तक्रारीचे निरसन होणे अपेक्षित असून, तसा करार कंत्राटदारांसोबत करण्यात आला आहे. हद्दवाढीत सामील झालेल्या नवीन प्रभागात पंधरा-पंधरा दिवस पथदिव्यांची दुरुस्ती केली जात नाही, हे येथे उल्लेखनीय.

निम्मे काम आटोपल्याचा दावा!शहरात मे. रॉयल इलेक्ट्रॉनिक कंपनीने मे २०१७ मध्ये एलईडी पथदिवे लावण्याच्या कामाला सुरुवात केली. यामध्ये मुख्य ५० रस्त्यांसह ११० प्रमुख चौकांचा समावेश आहे. कंपनीकडून संबंधित पथदिव्यांची पाच वर्षांपर्यंत देखभाल दुरुस्ती केली जाणार आहे. दीड वर्षांच्या कालावधीत कंपनीने ७४ टक्के काम पूर्ण केल्याचा दावा प्रशासनाकडून होत आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका