शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

मूर्तिजापूरात नोंदणी ७ हजार शेतकऱ्यांची; माल विकला २ हजार शेतकऱ्यांनी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2020 11:03 IST

Agriculture Sector, Akola Farmer शेतकऱ्यांनी ई-नाम योजनेकडे  पाठ फिरविली आहे.

- संजय उमक लोकमत न्यूज नेटवर्कमूर्तिजापूर : केंद्र शासनाने शेतकऱ्यांचा धान्य माल ई- लिलावानुसार खरेदी करण्यासाठी १४ एप्रिल २०१६ पासून ई-नाम योजना सुरू केली आहे. ही योजना येथील बाजार समितीने अमलात आणली असली तरी शेतकऱ्यांनी याकडे  पाठ फिरविली आहे. तर या योजनेपासून अनेक शेतकरी अनभिज्ञ आहेत. यामुळे शेतकऱ्यांनी पारंपरिक लिलावालाच पसंती दर्शवली आहे.आतापर्यंत ई-नाम योजनेंतर्गत मूर्तिजापूर बाजार समितीत ७ हजार ९४८ शेतकऱ्यांनी आपली नोंदणी केली आहे. पैकी केवळ २ हजार ४७० शेतकऱ्यांनी आपला माल विकला आहे. यासाठी ८७ अडते व ५९ व्यापाऱ्यांनीही आपली नोंदणी केली आहे. या योजनेत माल विक्रीसाठी कमालीचा वेळ लागतो व कुठल्याही व्यापाºयाला कुठेही माल खरेदी करण्याची मुभा असल्याने अनोळखी व्यापाºयाकडून विक्री रक्कम मिळेल याची हमी नाही.पारंपरिक लिलावात ठरलेल्या व्यापाºयाकडून आगाऊ रक्कम घेण्याची प्रथा असल्याने ज्या दिवशी माल विकल्या जाईल, त्या दिवशी रक्कम कपात होते. शेतकºयांची ही अडचण व्यापारी भागवित असल्याने पारंपरिक लिलावच शेतकºयांसाठी सोईचा असल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे.या योजनेंतर्गत बाजार समितीमध्ये शेतमालाच्या पारंपरिक बोली पद्धतीचे लिलाव बंद करून त्याऐवजी आॅनलाइन लिलावासाठी ई-नाम हे व्यापार पोर्टल तयार करण्यात आले. सरकारने यासाठी बाजार समितीला ३० लाख रुपये किमतीचे संगणक, प्रिंटर, राउटर यांच्या खरेदीसह शेतमालाच्या गुणवत्ता व आर्द्रता तपासणीसाठी प्रयोगशाळा उभारण्यात आली. मिळविलेले अनेक साहित्य या बाजार समितीसाठी निरुपयोगी ठरले.

अशी आहे ई-नाम योजनाई-नाम (इंटरनॅशनल अ‍ॅग्रीकल्चर मार्केटिंग) या योजनेत मालाची गुणवत्ता तपासणी केली जाते. तो अहवाल शेतकºयाला मिळतो. शेतमालाचा फोटो पोर्टलवर अपलोड केला जातो. त्यानंतर मोबाइल अ‍ॅपवरून देशातील कोणताही व्यापारी कुठेही बसून लिलावात भाग घेऊ शकतो. व्यापारी आणि शेतकºयांना ही प्रक्रिया आनलाइन दिसते. शेतकरी मिळणाºया दराबाबत समाधानी असेल तरच मालाची खरेदी-विक्री होते. या लिलाव प्रक्रियेत अडते आणि मध्यस्थ नाहीत. मालाचे वजन झाल्यानंतर प्रत्यक्षात अडत्याला त्याचा ताबा मिळण्यापूर्वीच शेतकºयाच्या खात्यावर आॅनलाइन पैसे जमा केले जातात. देशातील कोणत्याही बाजारात मालाची विक्री करता येते.केंद्र शासनाच्या ई-नाम योजनेत बाजार समिती दुसºया टप्प्यात आहे. सद्यस्थितीत शेतकºयांची नोंदणी करणे व त्यांच्या मालाचा ई-लिलाव करण्यासाठी बाजार समिती प्रयत्नरत आहे.- रितेश मडगे, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, मूर्तिजापूर

 

 

टॅग्स :Murtijapurमुर्तिजापूरAkolaअकोलाAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती