राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत अकोल्याचे ७ खेळाडू

By Admin | Updated: January 29, 2015 00:41 IST2015-01-29T00:41:28+5:302015-01-29T00:41:28+5:30

विविध राष्ट्रीय स्तर कबड्डी स्पर्धेसाठी अकोला जिल्हा कबड्डी संघटनेच्या ७ खेळाडूंची निवड.

7 sportsmen in the Kabaddi competition | राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत अकोल्याचे ७ खेळाडू

राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत अकोल्याचे ७ खेळाडू

अकोला: अकोला जिल्हा कबड्डी संघटनेच्या ७ खेळाडूंची निवड विविध राष्ट्रीय स्तर कबड्डी स्पर्धेसाठी झाली. यामध्ये विविध गटातून विठ्ठल कुलट वरिष्ठ गट, राजू काळंके वरिष्ठ गट, किरण जरांगे ज्युनिअर गट यांची निवड केरळ येथे फेब्रुवारीमध्ये होणार्‍या नॅशनल गेम्सकरिता झाली. स्पर्धेत तिघेही महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करतील. तसेच मनीषा जाधव, शुभांगी नागे व शुभम दीक्षित यांची निवड बिहार येथे होणार्‍या सब-ज्युनिअर राष्ट्रीय स्पर्धेसाठी झाली. खेळाडूंचे जिल्हा संघटनेचे अध्यक्ष गुलाबराव गावंडे, सचिव वासुदेव नेरकर यांनी कौतुक केले.

Web Title: 7 sportsmen in the Kabaddi competition