६५हजार विहिरींच्या मार्गात मजूरीचा अडसर!
By Admin | Updated: March 27, 2015 01:26 IST2015-03-27T01:26:10+5:302015-03-27T01:26:10+5:30
कामे बंद होण्याचे प्रमाण वाढले.

६५हजार विहिरींच्या मार्गात मजूरीचा अडसर!
अकोला:महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत राज्यात सुरु असलेल्या ६५ हजार सिंचन विहिरींच्या कामासाठी वाढीव मजूरी आणि साहित्यावरील खर्चाचे प्रमाण राखण्यात प्रशासकीय यंत्रणेला तांत्रिक अडचणी निर्माण होत असल्याने मोठय़ा प्रमाणावर विहिरींची कामे बंद पडू लागली आहेत. राज्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (मनरेगा)वैयक्तीक लाभाच्या योजनेमधून ६५ हजार सिंचन विहिरींची कामे सुरु आहेत. या कामांसाठी कुशल आणि अकुशल अशा दोन बाबींवर अंदाजपत्रकीय तरतुद केली जाते. सिंचन विहिरींच्या अकुशल कामांचा खर्च ८१८ कोटी तर अकुशल कामांचा खर्च ५९0 कोटी रुपये आहे. यापैकी २0१४-१५ या वर्षात अकुशल बाबींवर ९५ कोटी, तर कुशल बाबींवर २0 टक्के रक्कम खर्च झाल्याची माहिती आहे. या कामांसाठी मजूरी आणि साहित्यावरील खर्चाचे प्रमाण ६0:४0 असे निर्धारित करण्यात आले असले तरी प्रत्यक्षात खर्चाचे प्रमाण ७0:३0 असे होत आहे. खर्चाचे प्रमाण लक्षात घेता, विहिरींची कामे पूर्ण करण्यास क्षेत्रीय पातळीवर अडचणी निर्माण होत आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये खर्चाचे प्रमाण कसे राखायचे, याबाबत स्पष्टता नसल्याने विहिरींची कामे रखडली आहेत.