आतापर्यंत ६२५ नोटीस!
By Admin | Updated: January 19, 2015 02:37 IST2015-01-19T02:37:59+5:302015-01-19T02:37:59+5:30
अकोला शहरात अनधिकृत धार्मिक स्थळांना महापालिकेने दिल्या नोटीस.

आतापर्यंत ६२५ नोटीस!
अकोला - महानगरपालिकेच्यावतीने आतापर्यंत शहरातील ६२५ अनधिकृत धार्मिक स्थळांच्या व्यवस्थापनाला नोटीस बजाविली आहे. दोन दिवसात करण्यात आलेल्या या कार्यवाहिनंतर नोटीस बजाविण्यात आलेल्या धार्मिक स्थळांपैकी १0३ धार्मिक स्थळांच्या व्यवस्थापनाने मनपाकडे दस्तऐवजी सादर केले आहे. अकोला शहरात २00९ नंतर निर्माण करण्यात आलेले धार्मिक स्थळ हटविण्याची कारवाई महापालिकेतर्फे केली जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई करण्यासाठी दोन दिवसांपासून महापालिका प्रशासनातर्फे नोटीस बजाविण्याची प्रक्रिया सुरू आहे. गुरुवारपासून सुरू असलेल्या या कारवाईअंतर्गत आतापर्यंत ६२५ धामिंक स्थळांना नोटीस पाठविण्यात आली आहे. या धार्मिक स्थळांच्या व्यवस्थापनाला दस्तऐवजी सादर करण्याचे निर्देश या नोटीसद्वारे देण्यात आले आहे. ज्या धार्मिक स्थळांचे व्यवस्थापक नाही, त्या धार्मिक स्थळांवर नोटीस चिटकविण्यात आली आहे. पूर्व विभागात ११५ धार्मिक स्थळांना नोटीस देण्यात आली असून त्यापैकी ३२ धार्मिक स्थळांच्या व्यवस्थापनाने मनपा प्रशासनाकडे दस्तऐवज सादर केले आहे. पश्चिम विभागात आतापर्यंत १७९ नोटीस बजाविण्यात आल्या असून २९ जणांनी दस्तऐवज सादर केले. दक्षिण विभागात १९९ नोटीस देण्यात आल्या असून त्यापैकी ३0 जणांनी दस्तऐवज सादर केले. उत्तर विभागात बजावण्यात आलेल्या १३२ नोटीसपैकी १२ नोटीसला प्रतिसादर देत नागरिकांनी दस्तऐवज सादर केले आहे. सोमवारपासून नोटीसला उत्तर देण्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.