लग्नातील जेवनामुळे ६0 व-हाडींना विषबाधा

By Admin | Updated: March 17, 2015 00:54 IST2015-03-17T00:54:37+5:302015-03-17T00:54:37+5:30

वाशिम जिल्ह्यातील घटना.

60-bone poisoning due to wedding dinner | लग्नातील जेवनामुळे ६0 व-हाडींना विषबाधा

लग्नातील जेवनामुळे ६0 व-हाडींना विषबाधा

कारंजा लाड (जि. वाशिम) : लग्न सोहळ्यातील जेवणामुळे ६0 जणांना विषबाधा झाल्याची घटना रविवारी रात्री उशिरा घडली. दरम्यान, विषबाधा झालेल्या सर्व जणांची प्रकृती आता धोक्याबाहेर आहे. येथील सिंधी कॅम्प परिसरातील व्यावसायिक गोविंद बसंतवाणी यांचा मुलगा संजय यांचा विवाह सोहळा १५ मार्चला येथे आयोजित केला होता. या विवाह सोहळयात जेवण बनविण्याचे कंत्राट अमरावती येथील आनंद कॅटर्सला देण्यात आले होते. लग्नानंतर वर व वधूकडील मंडळींनी जेवण केल्यानंतर रात्री २ वाजताच्या सुमारास अनेकांना मळमळ, उलटी, चक्कर आदी त्रास जाणवू लागला. त्यामुळे रूग्णांना तातडीने शहरातील विविध रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. आता सर्व विषबाधा झालेल्या रुग्णांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर कारंजा शहर पोलिसांनी ग्रामीण रूग्णालयात उपचार घेणार्‍या रूग्णांचे जबाब नोंदविले आहेत. घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Web Title: 60-bone poisoning due to wedding dinner