सोयाबीन, हरभरा व मुगाचा ६ कोटीचा साठा जप्त

By Admin | Updated: October 26, 2015 01:55 IST2015-10-26T01:55:42+5:302015-10-26T01:55:42+5:30

चिखली येथे तीन वेअर हाउसवर छापे.

6 crore worth of soyabean, gram and muga seized | सोयाबीन, हरभरा व मुगाचा ६ कोटीचा साठा जप्त

सोयाबीन, हरभरा व मुगाचा ६ कोटीचा साठा जप्त

चिखली (जि. बुलडाणा) : शहरातील विविध वेअर हाऊसवर धाडी टाकून पुरवठा व महसूल विभागाने डाळी, खाद्य तेल आणि खाद्य तेलबियांचा तब्बल ६ कोटी २९ लाख ५८ हजार रुपये किमतीचा साठा जप्त केला. तहसीलदार राजेश्‍वर हांडे, नायब तहसीलदार श्याम धनमने, चवरे, तलाठी डवले यांच्या संयुक्त पथकाने २५ ऑगस्ट रोजी एमआयडीसी विविध तीन वेअर हाऊसवर धाडी टाकल्या. या तीन वेअर हाऊसमध्ये सुमारे ३0 पेक्षा अधिक व्यापार्‍यांनी सोयाबीन, हरभरा, मूग या डाळ, खाद्य तेल आणि खाद्य तेलिबयांची साठेबाजी केल्याची गोपनीय माहिती तहसीलदारांच्या पथकास मिळाली होती. त्यानुसार ही कारवाई करुन विविध व्यापार्‍यांनी साठवून ठेवलेला एकूण २ कोटी ४७ लाख ४0 हजार १00 रूपये किमतीचा १ हजार ४३९ क्विंटल हरभरा, ३ कोटी ६६ लाख १0 हजार ८३४ रूपये किमतीचे २ हजार २0७ क्विंटल सोयाबीन आणि १६ लाख ७ हजार ७७५ रूपये किमतीचा मूग जप्त केला. शासनाने आडते व व्यापार्‍यांना कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता केलेली ह्यवेअर हाऊस स्टॉक लिमीटह्णची कारवाई अन्यायकारक असल्याचे स्पष्ट करीत येथील मार्केट यार्डावरील चिखली आडत व्यापारी संघटनेने २६ ऑक्टोबर पासून बेमुदत बंद पुकारला आहे. या निर्णयामुळे मार्केटयार्डवरील शेतमालाची खरेदी-विक्री ठप्प पडणार आहे.

Web Title: 6 crore worth of soyabean, gram and muga seized