आरोग्य विभागाच्या परीक्षेला ५७.२१ टक्के उमेदवार गैरहजर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 10:30 AM2021-03-01T10:30:29+5:302021-03-01T10:30:44+5:30

Akola News परीक्षेसाठी जिल्ह्यातील १९ हजार ६४९ उमेदवार पात्र ठरले होते. त्यापैकी केवळ ८ हजार ४०६ उमेदवारांनीच परीक्षा केंद्रावर हजेरी लावली.

57.21 per cent candidates absent from health department exams | आरोग्य विभागाच्या परीक्षेला ५७.२१ टक्के उमेदवार गैरहजर!

आरोग्य विभागाच्या परीक्षेला ५७.२१ टक्के उमेदवार गैरहजर!

Next

अकोला: सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत विविध रिक्त पदांसाठी रविवार २८ फेब्रुवारी रोजी २७ केंद्रावर परीक्षा घेण्यात आली. दोन सत्रांमध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेला ५७.२१ टक्के उमेदवारांनी दांडी मारल्याचे दिसून आले. परीक्षेसाठी जिल्ह्यातील १९ हजार ६४९ उमेदवार पात्र ठरले होते. त्यापैकी केवळ ८ हजार ४०६ उमेदवारांनीच परीक्षा केंद्रावर हजेरी लावली. आरोग्य सेवा आयुक्तालयाच्या अधिपत्याखालील रिक्त पदांच्या पदभरतीसाठी फेब्रुवारी २०१९ मध्ये महापोर्टलवर जाहिरात देऊन आवेदने मागविण्यात आली होती. दरम्यान महापोर्टल रद्द झाल्याने ही परीक्षा प्रक्रिया मध्येच रखडली होती. मध्यंतरी कोरोनामुळे आरोग्य सेवेवरील ताण वाढल्याने रिक्त पदभरतीची मागणी वाढू लागली. आरोग्य सेवेवरील वाढता ताण आणि रिक्त पदे लक्षात घेता, मंत्रिमंडळाने सार्वजनिक आरोग्य विभागातील रिक्त जागांपैकी ५० टक्के पदभरतीस मान्यता दिली. त्यानुसार, रविवार २८ फेब्रुवारी रोजी राज्यभरात विविध रिक्त पदांसाठी ही परीक्षा घेण्यात आली. जिल्ह्यात २७ केंद्रावर ही परीक्षा घेण्यात आली. सकाळच्या पहिल्या सत्रात १००३६ उमेदवारांपैकी, ३५९२ उमेदवारांनी परीक्षा दिली, तर ६४४४ परीक्षार्थी गैरहजर होते. दुपारच्या सत्रात ९६१३ पैकी ४८१४ परीक्षार्थी परीक्षेला बसले, तर ४७९९ परीक्षार्थी गैरहजर होते. जिल्ह्यातील एकूण १९६४९ परीक्षार्थींपैकी ८४०६ जणांनी परीक्षा दिली, तर तब्बल ११ हजार २४३ परीक्षार्थी परीक्षेला गैरहजर राहीले.

अनेकांचा झाला हिरमोड

आरोग्य सेवा आयुक्तालयाच्या अधिपत्याखालील रिक्त पदांच्या पदभरतीसाठी फेब्रुवारी २०१९ मध्ये महापोर्टलवर जाहिरात देऊन आवेदने मागविण्यात आली होती. दरम्यान महापोर्टल रद्द झाल्याने ही परीक्षा प्रक्रिया मध्येच रखडली होती. मध्यंतरी कोरोनामुळे आरोग्य सेवेवरील ताण वाढल्याने रिक्त पदभरतीची मागणी वाढू लागली. या पदभरतीपासून अनेक बेरोजगारांना अपेक्षा होत्या. त्यानुसार ते परीक्षेच्या तयारीलाही लागले. १८ जानेवारी रोजी आरोग्य विभागाच्या पदभरतीची जाहिरात निघाली अन् अनेकांचा हिरमोड झाला होता.

Web Title: 57.21 per cent candidates absent from health department exams

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.