शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्ह्यातील ५६८ विद्यार्थी प्री-मॅट्रिक शिष्यवृत्तीपासून वंचित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 13:52 IST

अकोला : शासनाच्यावतीने दरवर्षी अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती देण्यात येते; परंतु २00९-१0 ते २0१४-१५ या कालावधीत प्री-मॅट्रिक शिष्यवृत्तीस पात्र ठरलेले अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थी चार वर्षांपासून शिष्यवृत्तीपासून वंचित आहेत.

ठळक मुद्दे२00९-१0 ते २0१४-१५ या कालावधीत प्री-मॅट्रिक शिष्यवृत्तीस पात्र ठरलेले अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थी चार वर्षांपासून शिष्यवृत्तीपासून वंचित आहेत.शाळा व शिक्षकांच्या चुकीमुळे जिल्ह्यातील ५६८ विद्यार्थ्यांच्या खात्यात ५ लाख ६८ हजार रुपयांची रक्कम जमा होऊ शकलेली नाही. विद्यार्थ्यांच्या बँकेची माहिती सरल प्रणालीद्वारे भरल्यासच, शिष्यवृत्ती जमा होईल.

अकोला : शासनाच्यावतीने दरवर्षी अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती देण्यात येते; परंतु २00९-१0 ते २0१४-१५ या कालावधीत प्री-मॅट्रिक शिष्यवृत्तीस पात्र ठरलेले अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थी चार वर्षांपासून शिष्यवृत्तीपासून वंचित आहेत. शाळा व शिक्षकांच्या चुकीमुळे जिल्ह्यातील ५६८ विद्यार्थ्यांच्या खात्यात ५ लाख ६८ हजार रुपयांची रक्कम जमा होऊ शकलेली नाही.राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना देण्यात येणारी प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती रखडलेली असून, चुकीच्या आणि अपुºया बँक खात्यांच्या माहितीमुळे विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये शिष्यवृत्ती जमा होऊ शकलेली नाही. अप्राप्त शिष्यवृत्ती विद्यार्थी सरल डाटा बेसमध्ये शोधून व त्यांच्याबाबतची आवश्यक माहिती प्राप्त करून ही शिष्यवृत्तीची रक्कम खात्यांमध्ये जमा करण्याचा आदेश अल्पसंख्याक व प्रौढ शिक्षण संचालनालयाने दिले होते; परंतु २00९-१0 ते २0१४-१५ पर्यंतची यादी वगळता, २0१२-१३ व २0१३-१४ साठी महाआॅनलाइनकडून डाटा अप्राप्त असल्यामुळे विद्यार्थी शोधता न आल्यामुळे ही शिष्यवृत्ती रखडली असल्याचे कारण देण्यात येत आहे. त्यामुळे अल्पसंख्याक व प्रौढ शिक्षण संचालनालयाने पुन्हा सर्व विद्यार्थ्यांच्या बँकेची माहिती सरल प्रणालीद्वारे भरण्याच्या सूचना दिल्या आहेत.कशी भरावी माहितीसरल प्रणालीद्वारे वर्षनिहाय सर्व विद्यार्थ्यांच्या बँकेचे नाव, खाते क्रमांक, आयएफएससी, आधार कार्ड क्रमांक व पालकांचा मोबाइल आदी माहिती, विद्यार्थ्यांची माहिती सरल प्रणालीमध्ये शाळेच्या लॉगिन व संचालनालयाच्या संकेतस्थळावर दिली आहे. सरल प्रणालीमध्ये विद्यार्थ्यांची आॅनलाइन माहिती घेण्यासाठी शाळेने त्यांच्या सरल लॉगिन आयडीवर व पासवर्डचा वापर करावा. शिक्षणाधिकारी निरंतर यांच्यासाठी नवीन लॉगिन आयडी व पासवर्ड तयार केला असून, शैक्षणिक वर्षात एका विद्यार्थ्याचे नाव एकापेक्षा जास्तवेळा आल्यास, त्या विद्यार्थ्यांची माहिती फक्त एकदा भरून उर्वरित माहिती अपूर्ण ठेवा व याबाबतची माहिती शिक्षणाधिकारी, संचालक, अल्पसंख्याक व प्रौढ शिक्षण, पुणे यांना कळवा. सरल प्रणालीमध्ये शिक्षणाधिकाºयांनी त्यांच्या लॉगिनमधून शाळेने भरलेली विद्यार्थ्यांच्या माहितीची, बँक खात्याच्या पहिल्या पानाची प्रत व आधार कार्डाची प्रतद्वारे पडताळणी करावयाची आहे. शाळेने दिलेल्या माहितीमध्ये दुरुस्ती करावयाची असल्यास ती करता येईल.

 

टॅग्स :Akola cityअकोला शहरSchoolशाळाStudentविद्यार्थी